या वीकेंडला आपल्या मुलांसाठी बनवा सुपर टेस्टी कॉर्न मफिन्स, जाणून घ्या रेसिपी

या वीकेंडला घरी तुमच्या मुलांसाठी मफिन्स बनवून तुमचा त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता.
corn muffins
corn muffinsDainik Gomantak
Published on
Updated on

प्रत्येकाला आपला वीकेंड खास बनवायचा असतो. विशेषत: मुले वीकेंडला उत्साही असतात कारण त्यांची सर्व खाण्याची इच्छा मजा आणि आनंदाने पूर्ण होते. या वीकेंडला घरी तुमच्या मुलांसाठी मफिन्स बनवून तुमचा त्यांचा आनंद द्विगुणित करू शकता. मफिन्स फक्त लहान मुलांनाच आवडत नाही तर मोठ्यांनाही ते खायला आवडते. (Recipe of Eggless Muffin)

साधारणपणे, ते सर्व पिठापासून बनवले जातात आणि ते बनवताना अंडी वापरली जातात. पण आज आम्ही तुम्हाला मक्याच्या पिठापासून बनवलेल्या एग्लेस मफिन्सबद्दल सांगणार आहोत. आपल्या शरिरासाठी आरोग्यदायी आणि चवदार देखील आहेत.तेव्हा आज एग्लेस मफिन्सच्या रेसिपीबद्दल जाणून घेवूया.

मफिन बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मफिन्ससाठी, तुम्हाला अर्धा कप मक्याचं मीठ, अर्धा कप मैदा, अर्धा कप साखर पावडर, अर्धा कप दही, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, एक चतुर्थांश कप बटर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, एक चमचा बेकिंग पावडर आणि टुटी-फ्रुटी.

मफिन्स बनवण्याची पद्धत

सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात मक्याचे पिठ आणि मैदी ते चांगले मिक्स करून घ्या. त्यात साखर पावडर घाला त्यानंतर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करा.

corn muffins
पिकलेल्या केळीपासून बनवा टेस्टी कचोरी

दरम्यान, एक वेगळे भांडे घ्या आणि त्यात दही आणि लोणी मिसळा आणि त्यात व्हॅनिला इसेन्स देखील घाला. तिन्ही गोष्टी अशा प्रकारे मिक्स करा की खूप गुळगुळीत पेस्ट दिसू लागेल.

आता त्यात मैदा आणि मक्याचे पिठ घालून चांगले मिसळा आणि त्यात टुटी-फ्रुटी घाला . पुन्हा एकदा सर्वकाही चांगले मिसळा.

यानंतर मेकरमध्ये बटर लावून थोडे गुळगुळीत करा. यामुळे मफिन बनवल्यानंतर सहज बाहेर पडतील. यानंतर मफिन्स मिश्रण मेकरमध्ये ठेवा.

यानंतर, मायक्रोवेव्ह 180 अंशांवर प्रीहीट करा . यानंतर मफिन्सचा ट्रे मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि 10 मिनिटांसाठी टायमर सेट करा.

10 मिनिटांनंतर मफिन चांगले सोनेरी तपकिरी रंगाचे होतील . आता टूथ पिक घ्या आणि त्यात घाला. जर मफिन्सची पेस्ट त्यावर चिकटली तर याचा अर्थ मफिन्सला थोडा वेळ बेक करावे लागेल, जर टूथ पिक स्वच्छ बाहेर आले तर मफिन्स बेक झाले असे समजा.

corn muffins
Healthy Food: मुगाची खिचडी निरोगी आरोग्यासाठी फायदेशिर

त्यानंतर ट्रे बाहेर काढून थंड होऊ द्या. चविष्ट आणि आरोग्यदायी कॉर्न मफिन्स तयार आहेत. आता त्यांना एअर टाईट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. आपण हा पदार्थ सुमारे एक आठवडा खाऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com