गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्रीखंडाने गोड करा तोंड

ड्रायफ्रुट्स आणि वेलचीच्या चवीने तयार केलेले श्रीखंड अप्रतिम लागते.
How to make Shrikhand at home,  Shrikhand Recipe, Gudi Padwa special sweet Recipe
How to make Shrikhand at home, Shrikhand Recipe, Gudi Padwa special sweet Recipe Dainik Gomantak
Published on
Updated on

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो. चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होते. या खास प्रसंगी श्रीखंडाने तोंड गोड करा. श्रीखंड गुजरात, महाराष्ट्र (Maharashtra), मध्य प्रदेशात खास बनवले जात असले तरी आता संपूर्ण भारतात ते खूप पसंत केले जात आहे. ड्रायफ्रुट्स आणि वेलचीच्या चवीने तयार केलेले श्रीखंड अप्रतिम लागते. (make Shrikhand on the occasion of Gudi Padwa)

How to make Shrikhand at home,  Shrikhand Recipe, Gudi Padwa special sweet Recipe
अश्वगंधामुळे महिलांमधील मानसिक ताण, वंध्यत्वाच्या समस्या दूर होते

तुम्हालाही गुढीपाडव्याला श्रीखंड बनवायचे असेल आणि तुम्ही आजपर्यंत घरी करून पाहिले नसेल, तर आम्ही तुम्हाला हा गोड पदार्थ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी सहज स्वादिष्ट श्रीखंड बनवू शकता. (Shrikhand Recipe)

  • श्रीखंड दही बनवण्यासाठी साहित्य

  • दही - 1 किलो

  • वेलची पावडर - 1 टीस्पून

  • बदाम - 10

  • काजू - 20

  • पिस्ता - 5

  • केशर - 1/2 टीस्पून

  • साखर - चवीनुसार

How to make Shrikhand at home,  Shrikhand Recipe, Gudi Padwa special sweet Recipe
'या' सोप्या व्यायामामुळे कमी होईल मधुमेह!

श्रीखंड बनवण्याची पद्धत (How to make Shrikhand at home)

श्रीखंड बनवण्यासाठी आधी दह्यातील सर्व पाणी (Water) काढून टाकणे आवश्यक आहे. यासाठी चाळणीत सुती कापड ठेवावे, चाळणी एका भांड्यावर ठेवावी आणि कपड्यावर दही ओतावे. आता भोवती कापड गोळा करून घट्ट बांधून घ्या म्हणजे दह्याचे पाणी पिळून निघून जाईल. यानंतर, दही बांधलेले कापड उंच जागी 7-8 तास लटकवा जेणेकरून दह्याचे सर्व पाणी निघून जाईल.

आता दही एका भांड्यात काढून 2-3 मिनिटे चांगले फेटून घ्या. यानंतर दह्यामध्ये साखर, वेलची पावडर आणि केशर घालून चांगले मिसळा आणि श्रीखंडातील गुठळ्या संपेपर्यंत फेटून घ्या. यानंतर श्रीखंडात चिरलेले काजू, बदाम आणि पिस्ते घालून सर्व चांगले मिसळा.

श्रीखंडाला केसरी रंग देण्यासाठी तुम्ही गोड पिवळा रंगही वापरू शकता. अशा प्रकारे तुमचे स्वादिष्ट श्रीखंड तयार आहे. सर्व्ह करण्यापूर्वी थोडा वेळ थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करण्यापूर्वी वर ड्रायफ्रूट्सने सजवा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com