त्वचेला मुलायम बनवण्यासाठी बनवा घरीच 3 कॉफी स्क्रब

कॉफी तुम्हाला ताजेतवाने आणि झटपट ऊर्जा देण्यास मदत करते.
Skin Care Tips in Marathi, How to make coffee scrub for skin in Marathi
Skin Care Tips in Marathi, How to make coffee scrub for skin in MarathiDainik Gomantak
Published on
Updated on

घरी कॉफी स्क्रब कसे बनवाल: (How to make coffee scrub for skin)

बहुतांश लोक त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफी पिऊनच करतात. कॉफी तुम्हाला ताजेतवाने आणि झटपट ऊर्जा देण्यास मदत करते. यासोबतच कॉफी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध कॉफी त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत होते. यासोबतच यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे त्वचेतील जळजळ होणाऱ्या समस्यांना दूर ठेवते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि बारीक रेषा दूर होण्यास याची मदत होते. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला कॉफीच्या मदतीने स्क्रब कसा बनवायचा ते सांगणार आहोत. (Make 3 coffee scrubs at home to soften skin)

Skin Care Tips in Marathi, How to make coffee scrub for skin in Marathi
मासिक पाळी दरम्यान असह्य वेदना, होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

त्वचेला एक्सफोलिएशन खूप महत्वाचे आहे आणि त्यामुळे मृत झालेल्या त्वचा दूर होण्यास मदत होते. यासोबतच ते त्वचेवर जमा झालेले खरुज साफ करण्यासही मदत करत असतात. त्वचेवर रंगद्रव्य असले तरीही, तुम्ही स्क्रब वापरावा कारण ते तुम्हाला मदत करतात. तर कॉफी स्क्रब कसा बनवायचा ते जाणून घेऊया- (Skin Care Tips in Marathi)

1) डार्क सर्कलसाठी कॉफी स्क्रब

ते बनवण्यासाठी तुम्हाला कॉफी पावडर, नारळ साखर, ऑलिव्ह ऑईल, लिंबाचा रस साहित्य लागेल. हे करण्यासाठी, सर्व गोष्टी नीट एकत्र करुन घ्या आणि नंतर चेहऱ्यावर डार्क सर्कल जिथे जिथे आहे तेथे लावून घ्या. 5 ते 7 मिनिटांनी स्क्रब लावलेली त्वचा स्वच्छ करून घ्या. या सर्व गोष्टी रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत करतात. यासोबतच फेस स्क्रबमध्ये असलेले कॅफिन डोळ्यांखालील काळेपणा साफ करण्यास मदत करते

2) तेलकट त्वचेसाठी स्क्रब वापरा

हे बनवण्यासाठी तुम्हाला कॉफी पावडर, खोबरेल तेल, मध आणि लिंबाचा रस आवश्यक आहे. ते तयार करण्यासाठी, सर्व गोष्टी मिसळा आणि नंतर सर्कुलर मोशन मध्ये चेहऱ्यावर स्क्रब करुन घ्या. हे त्वचेतील घाण काढून टाकण्यास मदत करतात.

Skin Care Tips in Marathi, How to make coffee scrub for skin in Marathi
तुमच्या नखांवरही पांढरे डाग आहेत का? ताबडतोब सावध व्हा!

3) कोरड्या त्वचेसाठी स्क्रब करा

हे बनवण्यासाठी तुम्हाला दही आणि कॉफीची गरज आहे, दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर मसाज करुन घ्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचा चमकदार आणि मुलायम होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com