5 Door Mahindra Thar: महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या ग्राहकांसाठी लोकप्रिय एसयूव्ही थार ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट लाँच केली आहे.
ही फ्लॅगशिप ऑफ रोडर SUV दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान या कारच्या इलेक्ट्रिक अवतार लाँच करण्यात आला.
थारच्या इलेक्ट्रिक अवतारच्या डिझाईनमध्ये तुम्हाला काही नवीन बदल पाहायला मिळणार आहे.
महिंद्रा थार इलेक्ट्रिक एसयूव्ही कंपनीच्या बॉर्न इलेक्ट्रिक लाइनअपचा भाग आहे.
केपटाऊनमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान कंपनीने स्पष्ट केले आहे, की थारचा इलेक्ट्रिक अवतार INGLO-P1 EV प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आला आहे.
थार इलेक्ट्रिक कारबद्दल खास गोष्टी
या कारमध्ये तुम्हाला चांगली बॅटरी क्षमता आणि कमी वाहन वजनासह चांगल्या रेंजसाठी ट्यून केले गेले आहे.
थार इलेक्ट्रिकसह, तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त ग्राउंड क्लीयरन्स मिळेल आणि ऑल-व्हील ड्राइव्ह टेक्नॉलाँजी देखील मिळेल.
महिंद्राने हे देखील सांगितले आहे की Thar.E इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट SUV 2776 मिलीमीटर आणि 2,976 मीलीमीटर दरम्यान व्हीलबेससह येईल. या इलेक्ट्रिक एसयूव्हीचा ग्राउंड क्लीयरन्स देखील सुमारे 300 मीलीमीटर असेल.
बॅटरी आणि लॉन्च डिटेल्स
महिंद्राने या इलेक्ट्रिक एसयूव्हीच्या बॅटरीशी संबंधित कोणतीही माहिती अद्याप शेअर केलेली नाही.
तसेच थारचा इलेक्ट्रिक अवतार बाजारात कधी लाँच केला जाईल याची माहिती देखील दिली नाही. पण या कारचे प्रोडक्शन २०१५ मध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
डिझाइन
या कारच्या लुकबद्दल बोलायचे झाल्यास थार इलेक्ट्रिक सध्या भारतात विकल्या जात असलेल्या थारपेक्षा डिझाइनच्या बाबतीत पूर्णपणे वेगळे आहे.
आता कारच्या पुढील भागात दिलेला एलईडी हेडलाईट नवीन चौकोनी डिझाइनमध्ये दिसत आहे. इतकंच नाही तर लवकरच तुम्हाला पूर्णपणे फ्रेश लूकसह इलेक्ट्रिक अवतार पाहायला मिळणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.