यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. देशभरात एकूण 543 जागांवर 7 टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदान पार पडणार असून 4 जून रोजी निकाल लागणार आहेत.
उन्हाळ्यात देशभरात निवडणुका होणार आहेत. एप्रिल-मे च्या कडक उन्हात लोकांना मतदानासाठी बूथवर जावे लागणार आहे. अशावेळी मतदारांनीही आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मतदानासाठी बूथवर जाताना पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात उन्हाचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
एप्रिल आणि मे महिन्याच्या कडक उन्हात लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी बाहेर जाण्यापूर्वी पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे चक्कर येऊ शकते.
मतदानाला जाण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा आणि केस व्यवस्थित झाकून घ्यावे. यामुळे तुमचा उन्हापासून संरक्षण होईल आणि तुमची ऊर्जाही कमी होणार नाही. यासाठी स्कार्फ किंवा टोपी वापरावी.
सूर्यप्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी सनग्लासेस घाला. उन्हाळ्यात डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.
मतदाना दरम्यान बूथवर गर्दी झाल्यास थोडा वेळ लागू शकतो. अशावेळी ज्येष्ठांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी एकत्रितपणे सहभागी व्हावे. खराब हवामानामुळे मतदान न करून तुमचे अमूल्य मत वाया घालवू नका.
मदताना दरम्यान, बूथवर गर्दी असेल तर थोडे अंतर ठेऊन उभे राहावे. यामुळे तुम्हाल गर्मीने चक्कर आल्यासारखे वाटणार नाही. तसेच घरातून बाहेर पडतांना पोट जेवण आणि पाणी पिऊन निघावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.