Guava Leaf Tea: बाजारात लाल आणि पांढरे दोन्ही प्रकारचे पेरू उपलब्ध असतात. पेरूपासून चटणी, चाट, ज्यूस आणि स्मूदीसह अनेक पदार्थ घरांमध्ये बनवले जातात. पण तुम्हाला माहित आहे का की पेरू व्यतिरिक्त त्याची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पेरूच्या पानांपासून बनवलेला हा फक्कड चहा हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर असतो.
अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असलेला पेरूचा चहा पिणे जरा विचित्र वाटेल, पण अशा प्रकारे तयार केल्यास त्याची चवही अप्रतिम होऊ शकते. हा चहा शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतो. चला तर मग जाणून घेऊया पेरूच्या पानांपासून चहा कसा बनवावा.
चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
पेरूची पाने
एक तृतीयांश चहाची पाने
दीड कप पाणी
गोडपणासाठी मध
पेरूच्या पानांपासून चहा कसा बनवायचा
चहा बनवण्यापूर्वी पेरूची दहा पाने पाण्यात चांगली धुवून घ्या.
नंतर एका भांड्यात दीड कप पाणी टाकून गरम करायला ठेवावे.
पाण्याला उकळी आल्यावर त्यात धुतलेली पेरूची पाने टाका आणि उकळू द्यावे.
रंगासाठी सामान्य चहाची पाने घाला आणि चांगली उकळू द्या.
चहाची पाने आणि पेरूची पाने 10-15 मिनिटे चांगली उकळू द्या. यामुळे पेरू आणि चहाच्या पानांच्या दोन्ही चवी व्यवस्थित मिक्स होतील.
उकळी आल्यावर एका कपमध्ये गाळून घ्यावे आणि त्यात गोडपणासाठी मध किंवा गुळ टाकू शकता.
तुमचा पेरू चहा तयार आहे.
चहा बनवताना कोणती काळजी घ्याल
पेरूच्या मऊ पानांऐवजी कडक आणि डार्क हिरव्या रंगाची पाने वापरावीत.
जर तुम्हाला चहामध्ये मध टाकायचे नसेल तर तुम्ही गूळाचा वापर करू शकता.
पेरूच्या पानांचा चहा आरोग्यदायी बनवण्यासाठी तुम्ही त्यात तुळशीचे पानं आणि आलं यांसारख्या इतर औषधी वनस्पती टाकू शकता.
चहा बनवताना पेरूची पाने कापून उकळू शकता.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.