पाठदुखीचा किंवा पाठीच्या कण्याचा त्रास असलेल्यांनी 'कोनासन' (Konasana) केल्यास त्याचे निश्चितच फायदे जाणवू लागतील. या आसनामुळे संपूर्ण शरीराला चांगला ताण मिळेल. त्याचसोबत पाठीच्या कण्याची लवचिकताही वाढते. हे आसन कसे करावे आणि त्याचे इतर फायदे कोणते ते जाणून घेऊयात.(Learn the benefits of Konasana)
कोनासन कसे करावे?
जमिनीवर किंवा योग मॅटवर विश्राम स्थितीत उभे राहावे. दोन्ही पायांमध्ये थोडे अधिक अंतर ठेवा. आता उजवा हात वर उचला. त्यानंतर हळूहळू डाव्या पायाच्या जवळ खाली वाका. आता डाव्या हाताने डावा पाय पकडून उजव्या हात आणि त्याचा तळवा ताठ ठेवा. हे आसन करताना मान वर करून उजव्या हाताकडे पहा. थोडा वेळ याच स्थितीत थांबल्यानंतर हिच कृती डाव्या हाताने करा.
कोनासन करण्याचे फायदे कोणते?
- शरीराला चांगला ताण मिळतो. या आसनामुळे पायांना आणि ओटीपोटाच्या आतील आणि बाहेरील स्नायूंना योग्य प्रमाणात ताण मिळतो.
- ओटीपोटातील विविध अवयवांचे कार्य सुधारते.
- कमरेजवळील अतिरिक्त चरबी कमी होते.
- पाठीच्या कण्याची लवचिकता वाढते.
- शरीराची स्थिरता वाढवण्यास मदत मिळते.
- पोटाच्या स्नायूंचे कार्य सुधारते, त्यामुळे शरीराचे संतुलन आणि स्थिरता सुधारते.
- पाठ आणि पाठीच्या कण्याचा कडकपणा कमी करते आणि त्यांची लवचिकता वाढवते.
- कमरेखालील भाग आणि खांदे मोकळे होतात.
- तणाव कमी करण्यात मदत होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.