Daily योग: पाठदुखीने त्रस्त आहात? अर्ध कटिचक्रासन नक्की करून पहा

Daily Yoga Ardha kati chakrasana
Daily Yoga Ardha kati chakrasana

पाठदुखीचा त्रास अनेकांना होत असतो. या पाठदुखीची कारणं अनेक असू शकतात. मात्र, यामागे कमकुवत स्नायू आणि लवचिकता कमी असल्याचं महत्त्वाचं कारण आहे. चुकीचे बसणे, दीर्घकाळ एकाच स्थितीत बसणे, दीर्घकाळ उभे राहणे यामुळेही पाठदुखीचा, कंबर दुखीचा त्रास होतो. सध्या अनेकजण 'वर्क फ्रॉम होम' करत असल्याने हा त्रास अनेकांना जाणवत असणार. अशा वेळी कामातून थोडा वेळ काढून हे आसन केल्यास त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होऊ शकेल. (Daily Yoga Ardha kati chakrasana to reduce back pain)

कंबरदुखीचा त्रास दुर करण्यासाठी करा भद्रासन

अर्ध कटिचक्रासन कसे करावे?
हे आसन करताना शरीराची स्थिती ही अर्ध्या चक्रासारखी होते, म्हणूनच त्याला अर्ध कटिचक्रासन असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी सर्वांत आधी सरळ सावधान स्थितीत उभे राहा. त्यानंतर उजवा हात सरळ डोक्याच्या वर उचला आणि हळूहळू डावीकडे झुकण्याचा प्रयत्न करा. यावेळी हाताचा कोपरा ताठ आणि हातांची बोटं सरळ ठेवा. गुडघे ताठ ठेवून या स्थितीत नेहमीप्रमाणे श्वासोच्छवास करत थोडा वेळ उभे राहा. यानंतर उजवा हात हळूहळू पूर्वस्थितीत आणत खाली करा. 

श्वास घेण्याची योग्य पद्धत कोणती?

अर्ध कटिचक्रासनाचे फायदे कोणते?

  • - पाठीचे स्नायू आणि पाठीचा कणा लवचिक होतो.

  • - फुफ्फुसातील ब्लॉकेज साफ होतात आणि श्वासोच्छवास सुधारण्यास मदत होते.

  • - पार्श्वभागाची लवचिकता वाढवते.

  • - छातीजवळील स्नायूंना योग्य ताण मिळतो.

  • - मूत्रपिंडाची कार्ये सुधारण्यास मदत होते. 

  • - अतिरिक्त चरबी कमी करून बांधा सुडौल होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com