Laptop Repairing Tips: लॅपटॉपची बॅटरी चार्ज होत नसेल तर घरीच ट्राय करा ही ट्रीक, होईल मोठी बचत

जर तुम्ही लॅपटॉप वापरत असाल आणि तुम्हाला चार्जिंगची समस्या येत असेल तर या टिप्स फक्त तुमच्यासाठीच आहे.
Laptop Repairing Tips:
Laptop Repairing Tips:Dainik Gomantak
Published on
Updated on

Laptop Repairing Tips: तुमच्यासोबत असे किती वेळा झाले आहे की तुम्ही लॅपटॉपवर तुमचे काम करत असता आणि अचानक तुमच्या लॅपटॉपवर एक पॉप-अप नोटिफिकेशन येते की बॅटरी संपली आहे. तुमची चार्जर शोधण्यासाठी धावपळ सुरु होते. 

एकदा लॅपटॉप (Laptop) पॉवरशी कनेक्ट झाला की तुम्ही निश्चित्त होता. परंतु अनेक वेळा असे देखील होते पॉवरशी कनेक्ट केल्यानंतरही लॅपटॉप काम करत नाही. यासाठी आमही तुम्हाला काही साध्या टिप्स सांगणार आहोत.

  • अशी घ्या बॅटरीची काळजी


बॅटरीची काळजी घेण्याचे अनेक मार्ग असू शकतात. तुमच्या खराब वॉल आउटलेट किंवा लॅपटॉपमध्ये अशा अनेक समस्या असू शकतात. ज्यामुळे तुमच्या लॅपटॉपची बॅटरी चार्ज होत नाही.समस्या काय आहे हे जाणून घेतल्यास, आपण त्यात वाया जाणारे बरेच पैसे वाचवू शकतो. आम्ही तुम्हाला अशाच काही पद्धतींबद्दल सांगणार आहोत ज्या तुम्ही घरीच दूर करू शकता?

Laptop Repairing Tips:
Summer Care Tips: उन्हाळ्यात त्वचेला ठेवा नॅचरली हायड्रेट! ट्राय करा 'हे' फ्रुट मास्क
  • सर्वात पहिले लॅपटॉप चार्जर वॉल सॉकेट आणि तुमच्या लॅपटॉप प्लगशी योग्यरित्या जोडलेले आहे की नाही ते तपासावे. हे थोडं विचित्र वाटतं, पण अनेक वेळा आपण नीट प्लग-इन करायला विसरतो आणि त्यामुळे बॅटरी चार्ज होत नाही.

  • लॅपटॉप चार्जर दुसर्‍या सॉकेटमध्ये प्लग करण्याचा प्रयत्न करा. हे सॉकेटमध्ये समस्या आहे की नाही हे सांगेल. यानंतर, प्रथम चार्जरची केबल कोठूनही वळलेली किंवा तुटलेली आहे का ते तपासावे. 

  • लॅपटॉप एसी तपासा, तुम्हाला त्याचा रंग उडालेला दिसतो का? त्याचा वास घ्या आणि पहा, तुम्हाला जळण्याचा वास येत नाही का? प्लास्टिक जळण्याचा वास येत असेल तर पॉवर कनेक्टर बदलणे आवश्यक आहे. संबंधित कंपनीशी संपर्क साधा आणि ते वॉरंटी अंतर्गत आहे का ते पहा? वॉरंटी अंतर्गत असल्यास, तुम्हाला नवीन चार्जर किंवा पॉवर कनेक्टर मोफत मिळेल.

laptop charging
laptop chargingDainik Gomantak
  • असे केल्यानंतरही तुमचा लॅपटॉप चार्ज होत नसेल तर पॉवर कनेक्टर तपासावा. लॅपटॉपच्या चार्जिंग डॉकमध्ये काही धूळ असल्यास किंवा किंवा काहीतरी अडकले असल्यास ते स्वच्छ करावे. चार्जिंग पोर्टचे पॉइंट्स देखील स्वच्छ करावे.

  • तुम्ही चार्जरला योग्य पोर्टमध्ये प्लग करत आहात की नाही ते तपासावे. USB-C हा एक लोकप्रिय क्रॉस प्लॅटफॉर्म कनेक्टिंग डॉक आहे जो डेटा ट्रान्सफर आणि बॅटरी चार्जिंगसाठी वापरला जातो. काही उत्पादक USB-C पोर्ट फक्त डेटा ट्रान्सफरसाठी ठेवतात. त्यामुळे तुम्ही चार्जिंगसाठी वापरल्यास, तुमचे डिव्हाइस चार्ज होणार नाही. त्यामुळे चार्जिंगसाठी तुम्ही चार्जर योग्य पोर्टशी कनेक्ट करत आहात का याची काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com