Summer Care Tips: उन्हाळ्यात शरीर हायड्रेट राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे गरजेचे असते. तसेच फळं खाल्याने देखील शरीर हायड्रेट राहते. शरीराप्रमाणेच त्वचेला सुद्धा हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. फळांच्या मदतीने तुम्ही त्वचा नॅचरली हायड्रेट ठेवू शकता.
पब मेड सेंट्रलच्या संशोधनानुसार, फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर अँटी ऑक्सिडेंट असतात. जे सेल्युलरचे नुकसान करणाऱ्या फ्री रॅडिकल्सपासून त्वचेचे (Skin) संरक्षण करण्यास मदत करतात.
यासोबतच त्यामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजेही मोठ्या प्रमाणात असतात, जे त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही घरच्या घरी फळांचे मास्क बनवून स्किन हायड्रेट ठेवू शकता.
पपईचे मास्क
पपई हे बीटा-कॅरोटीन फळाचा पर्याय आहे, त्यात अनेक प्रकारचे फायटोकेमिकल्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आढळतात. एक्सफोलिएटिंग सोबतच ते सुरकुत्या आणि फाइन लाइन्स टाळण्यास मदत करते.
मध (Hunny) त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करेल. मास्क बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दोन चमचे पपईचा गर घ्या. तसेच आवश्यकतेनुसार एक चमचा मध आणि एलोवेरा जेल घाला. आता या फ्रूट मास्कने 10 मिनिटे मसाज करा आणि 15 मिनिटे राहू द्या.
बनाना फ्रुटमास्क
केळीमध्ये भरपूर लोहासोबतच पोटॅशियम, जीवनसत्त्वे ए, सी, बी 6 देखील जास्त प्रमाणात आढळून आले आहेत. यासोबतच यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सही आढळून आले आहेत. हे सर्व घटक त्वचेचे आरोग्य सुधारून बाह्य समस्यांपासून आराम देतात.
दह्यामध्ये (Curd) असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेला खोलवर स्वच्छ करून स्मूद करण्यास मदत करते. हे सर्व घटक त्वचेचे आरोग्य सुधारून बाह्य समस्यांपासून आराम देतात.
केळ्याचा फ्रूट मास्क (Fruits Mask) बनवण्यासाठी एका वाटीत केळी मॅश करा. आता त्यात 3 चमचे दही मिक्स करा. शेवटी अर्धा चमचा हळद मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा.
सफरचंद आणि ऑरेंज फ्रुटमास्क
सफरचंदांमध्ये व्हिटॅमिन ए, बी आणि व्हिटॅमिन सी सोबत त्वचेसाठी आवश्यक खनिजे आढळतात. जे त्वचेच्या पीएच लेव्हलचे संतुलन राखते. संत्र्याच्या रसाने त्वचेच्या समस्या वाढण्यापासून रोखता येतात.
सफरचंद (Apple) आणि संत्र्याचा मास्क बनवण्यासाठी एका बाउलमध्ये सफरचंद आणि संत्र्याचे दोन किंवा तीन तुकडे मॅश करा. आता त्यात अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून मसाज करा. 15 मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या, नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.
स्ट्रॉबेरी फ्रुटमास्क
स्ट्रॉबेरीमध्ये असलेले घटक त्वचेतील अतिरिक्त तेल काढून पिंपल्स कमी करण्यास मदत करतात. स्ट्रॉबेरीच्या वापरामुळे त्वचेची टॅनिंग दूर होऊन रंग सुधारण्यास मदत होते. कोको पावडर त्वचेला डीप क्लीन करून ती मऊ आणि चमकण्यास मदत करते.
स्ट्रॉबेरी फ्रूट मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये 6 ते 7 स्ट्रॉबेरी मॅश करा. यासोबत एक चमचा कोको पावडर आणि एक चमचा मध घाला. हा फ्रूट मास्क चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि 20 मिनिटे राहू द्या. नंतर चेहरा पाण्याने धुवावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.