Krishna Janmashtami 2023: जन्माष्टमीला श्री कृष्णाच्या पुजेत 'या' गोष्टींचा करावा समावेश

जन्माष्टमीला बाल गोपाळाची पुजा करतांना कोणत्या गोष्टींचा समावेश करावा हे जाणून घेऊया.
Krishna Janmashtami 2023
Krishna Janmashtami 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Krishna Janmashtami 2023: यावर्षी कृष्ण जन्माष्टमी ६ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे. कृष्ण जन्माष्टमी भारतातच नव्हे तर परदेशातही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालस्वरूपाची नियमानुसार पूजा केली जाते.

असे मानले जाते की जन्माष्टमीच्या दिवशी व्रत करून मध्यरात्री बाल गोपाळाची पूजा केल्याने अनेक संकट दूर होतात. तसेच घरात सुख आणि समृद्धी लाभते. श्रीकृष्णाच्या पूजेसाठी काही गोष्टी असणे आवश्यक आहे, त्याशिवाय पूजा अपूर्ण मानली जाते.

  • बासरी

कृष्णाला बासरी प्रिय आहे.यामुळे पुजेच बासरी ठेवावी.

  • गाईची मुर्ती

पुजा करताना श्री कृष्णालाच्या मुर्तीसोमर गायीची मुर्ती ठेवावी. हिंदू धर्मात गाईला खुप महत्व आहे. कारण असे मानले जाते की गायीच्या पोटात ३३ कोटी देव वास करतात .

  • तुळशीचे पान

श्री कृष्णाच्या प्रसादामध्ये तुळशीचे पान खुप गरजेचे आहे. त्याशिवाय भोग दिला जात नाही

  • मोरपिस

मोरपिसाशिवाय भगवान श्री कृष्णाची सजावच अपुर्ण राहते. मोरपिस घरात ठेवणे शुभ मानले जाते. कारण आयुष्यातील आर्थिक समस्या कमी होतात.

Krishna Janmashtami 2023
Krishna Janmashtami 2023: जन्माष्टमीला चार चौघात उठून दिसण्यासाठी, अशी करा पारंपारिक वेशभूषा
  • पाळणा

जन्माष्टमीला कृष्ण लहान मुलाच्या कूपात प्रकट होतात. पुजेमध्ये पाळणा ठेवावा. यामुळे घरात आनंद येतो

  • राधा-कृष्णाचा फोटो

जन्माष्टमीला घरात राधा-कृष्णाचा फोटो लावावा. यामुळे नवरा-बायकोमधील प्रेम वाढते.

  • शंख ठेवावा

श्री कृष्माची पुजा करतांना शंख ठेवावा. यामुळे घरात आर्थिक समस्या दूर होऊन धनलाभ होऊ शकतो.

जन्माष्टमी पूजेचे नियम

  1. शास्त्रानुसार श्रीकृष्णाचा जन्म भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्राच्या वेळी व रात्री झाला. म्हणूनच जन्माष्टमीच्या रात्री शुभ मुहूर्तावर कृष्णाचा जन्म साजरा करावा

  2. नंतर रात्री काकडी कापावी. असे मानले जाते की यामुळे श्रीकृष्ण घरात वास करतात. संतती वाढीत कधीच अडचण येत नाही.

  3. गोपालकाल्याशिवाय बाल गोपाळांची पूजा अपूर्ण मानली जाते. तसेच जन्मापूर्वी कृष्णाला चांगले सजवावे. त्यांना नवीन कपडे घाला. सुवासिक फुलांची सजवट करावी.

  4. जन्माष्टमीच्या उपवासाच्या दिवशी फक्त एकदाच फळे खावीत. रात्री पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी उपवास करणे चांगले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com