Kitchen Hacks| Dry Fruits
Kitchen Hacks| Dry Fruits Dainik Gomantak

Kitchen Hacks: असे स्टोअर करा 'Dry Fruits', वर्षानुवर्ष होणार नाही खराब

तुम्हाला जर ड्राय फ्रुड जास्त दिवसांसाठी स्टोअर करून ठेवायचे असेल तर तुम्ही या टिप्सचा वापर करू शकता.
Published on

know about how to store dry fruits

ड्राय फ्रुट्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये प्रथिने, पोटॅशिअम, कॅल्शिअम यासारके अनेक पोषक असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत मिळते. तसेच यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट अनेक प्रकारच्या संसर्गांना दूर ठेवते.

ड्राय फ्रुट्स खुप महाग असतात. यामुळे ते नीट ठेवणे गरजेचे असते. कारण ड्राय फ्रुट्स योग्य टिकाणी न ठेवल्यास त्यात किडे पडू सखते. जे चवीसह त्यातील पोषक घटक कमी करतात. ड्राय फ्रुट्स जास्त दिवस टिकून ठेवायचे असेल तर पुढिल काही ट्रिक्स वापरू शकता.

1) हवाबंद डब्बा

जर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ड्राय फ्रुट्स स्टोअर करत असाल तर असे करू नका. कारण असे केल्याने ड्राय फ्रुट्स लवकर खराब होऊ शकतात. ड्राय फ्रुट्स नेहमी हवाबंद डब्ब्यांमध्ये ठेवावे. ड्राय फ्रुट्स अनेक दिवसचांगले राहतील.

2) फ्रिज

ड्राय फ्रुट्स चांगले आणि अनेक दिवसांसाठी स्टोअर करायचे असेल तर तुम्ही फ्रिजमध्ये ठेऊ शकता. ड्राय फ्रुट्स तुम्ही त्यांना 6 महिने ते 1 वर्षापर्यंत फ्रेश ठेवू शकता.

Kitchen Hacks| Dry Fruits
Relationship: नात्याचे बंध इतके कमकुवत का होतायत?
Dry fruits
Dry fruitsDainik Gomantak

3) भाजुण ठेवावे


ड्राय फ्रुट्स जास्त दिवस आणि फ्रेश ठेवायचे असेल तर तुम्ही हलके भाजूण ठेऊ शकता. तसेच ड्राय फ्रुट्सला किड देखील लागणार नाही. तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून पाहू शकता.

4) ड्राय फ्रुट्स खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

ड्राय फ्रुट्स खरेदी करताना नीट पाहून खरेदी करावे.

ड्राय फ्रुट्स फ्रेश दिसत असेल तरच खरेदी करावे.

ड्राय फ्रुट्सचे पॅकेट खरेदी करत असाल तर त्यावरची एक्सपायरी डेट तपासावी.

तुम्ही जर सुटे ड्राय फ्रुट्स खरेदी करत असाल तर त्याचा वास घ्यावा, किंवा त्याला किड लागली नाही ना हे तपासावे.

ड्राय फ्रुट्सला जर खराब वास येत असेल असे ड्राय फ्रुट्स खरेदी करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com