प्रत्येत नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून राहते. पण सध्या नात्यांमध्ये कटूता येऊन जोडीदार सहजपणे एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय घेत आहेत. नातं टिकवून ठेवण्यासाठी दोघांनीही प्रयत्न करायला हवे अन्यथा एकाच बाजूने प्रयत्न करून नातं जास्त काळ टिकून राहू शकत नाही. जाणून घेऊया नात्याचे बंध इतकी कमकुवत का होत आहेत?
सोशल मिडियाचा प्रभाव
सोशल मिडियाचा वाढता वापर नातं कमकुवत करू शकतो. जर तुम्ही जोडीदारावर सारख लक्ष ठेवत असाल किंवा जोडीदाराला वेळ न देता सारखे सोशल मिडियाचा वापर करत असाल तर नात्यात दुरावा येऊ शकतो. असेच सुरू राहिले तर असे नातं जास्त काळ टिकून राहत नाही.
इगो
अनेक लोकांना इगो खुप असतो. पण नातं टिकवून ठेवायचे असेल तर दोघांमध्येही इगो नसावा.कोणताही निर्णय स्वत:च घेणे, प्रत्येक गोष्टीत मी पणा दाखवणे नात्यात दुरावा आणू शकतो. नात्यात जर इगोमुळे जोडीदाराची घुटमट होत असेल तर असे नात तुटायला जास्त वेळ लागत नाही.
वेगळे राहण्याचा निर्णय
पुर्वी नात्यामध्ये भांडण झाले तरी एकत्र राहत असे. नंतर बोलूण भांडण मिटत देखील होता. पण अलिकडच्या काळाच दोघांमध्ये भांडणे झाली की लगेच वेगळे होण्याचा निर्णय लोक घेत आहेत. भांडण सोडवण्याचा देखील प्रयत्न करत नाहीत. यामुळे नातं कमकुवत होऊन वेगळे राहण्याचा निर्णय घेतात.
समोरच्याचे न ऐकणे
नात टिकवण्यासाठी समोरच्या व्यक्तीचे ऐकणे देखील गरजेचे आहे. तुम्ही जर समोरच्या व्यक्तीचे एकत नसाल तर वाद होऊ शकतो. यामुळे नात तुटायला वेळ लागत नाही.
पालकांचा सहभाग
अनेक वेळा पालक मुल आणि मुलीच्या संसारात हस्तक्षेप करू लागतात. मुलाने असे करावे किंवा मुसीने असे करावे असा सल्ला देत असतात. यामुळे दोघांमध्ये गैरसमज निर्माण होऊन नात कमकुत होते आणि काही दिवसामध्ये नात तुटायला सुरूवात होते.
संवादाचा अभाव
नात्यात जर योग्य संवाद होत नसेल तर नात्यात कमकुवतपणा येऊ शकतो. यामुळे अनेक लोक वेगळे राहण्याचा निर्णय घेऊ शकतात. तुमच्यामध्येही संवाद होत नसेल तर असे करू नका. आपल्या जोडीदाराशी संवाद साधा. यामुळे नातं मजबुत होण्यास मदत होईल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.