Kitchen Cleaning Tips: तेलकटपणा घालवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

या टिप्स (Tips) वापरुन कमी वेळेत तुमचे स्वयंपाकघर (Kitchen) स्वच्छ होईल.
Kitchen Cleaning Tips: तेलकटपणा घालवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Dainik Gomantak
Published on
Updated on

सर्वांना आपले स्वयंपाकघर (Kitchen) स्वच्छ असावे असे वाटते. परंतु ते स्वच्छ (Clean) करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. जर तुम्हालासुद्धा स्वयंपाकघर (Kitchen) स्वच्छ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत असेल तर या सोप्या टिप्स (Tips) वापरुन पाहा. या टिप्स वापरुन कमी वेळेत तुमचे स्वयंपाकघर स्वच्छ (Clean) होईल.

Kitchen Cleaning Tips: तेलकटपणा घालवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Skin Care Tips: त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी घ्या वाफ

* स्वयंपाक घरातील टाईल्सची स्वच्छता

स्वयंपाकघरात स्वयंपाक झाल्यानंतर टाईल्सवर तेलकटपना दिसून येतो. या टाईल्स खराब दिसतात. यामुळे टाईल्स स्वच्छ करण्यासाठी एका बॉटलमध्ये 1 कप व्हीनेगर घ्या. त्यात 1 कप बेकिंग सोडा टाकावा. या मिश्रणाला चांगले मिक्स करावे. हे मिश्रण टाईल्सवर टाकून टूथब्रशने स्वच्छ करावे. तसेच तुम्ही यात साबणाचे पाणी देखील टाकू शकता. यामुळे तुमच्या स्वयंपाकघरातील स्टाइल्सवरील चिकटपना कमी होईल.

Kitchen Cleaning Tips: तेलकटपणा घालवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Monsoon Care Tips: टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी घरीच बनवा 'डी-टॅन' पॅक

* चॉपिंग बोर्डची स्वच्छता

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात चॉपिंग बोर्ड हे असतेच. यामुळे त्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. ते स्वच्छ करण्यासाठी बोर्डवर थोडे मीठ टाकावे आणि त्यावर लिंबाचा रस टाकावा. पाच मिनिटे चॉपिंग बोर्डला चांगले घासून काढावे. असे केल्याने चॉपिंग बोर्डवरील वास आणि डाग नाहीसे होतात.

Kitchen Cleaning Tips: तेलकटपणा घालवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Monsoon Hair Care Tips: तेलकट आणि चिपचिप केसांमुळे त्रस्त आहात ?

* स्वयंपाकघरातील स्पंजची स्वच्छता

अनेकजण स्वयंपाकघर स्वच्छ करताना स्पंजची स्वच्छता करायला विसरून जातात. स्पंजची स्वच्छता करणे देखील महत्वाचे आहे. कारण यावर देखील जिवाणू वाढू शकतात. स्वयंपाकघरातील स्पंज दिवसातून एकदातरी स्वच्छ करावे. यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घ्यावे आणि त्यात थोडे साबणाचे पाणी टाकावे. या पाण्यात स्पंज टाकून ठेवावे. नंतर त्याला 5 मिनिटासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवावे. स्पंजमधील सर्व घाण आणि तेलकटपना निघून जाईल.

Kitchen Cleaning Tips: तेलकटपणा घालवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
Monsoon Care Tips: टॅनिंगपासून सुटका मिळवण्यासाठी घरीच बनवा 'डी-टॅन' पॅक

* जळालेल्या भांड्यांची स्वच्छता

स्वयंपाक करतांना कधी कधी भांडी जाळून जातात. यामुळे असे भांडे स्वच्छ करणे कठीण होते. असे भांडे स्वच्छ करण्यासाठी भांड्यात एक पाणी घ्यावे आणि त्यात एक कप व्हिनेगर टाकावे. हे पाणी पाच मिनिटे उकळण्यासाठी ठेवावे. नंतर त्यात 2 चमचे बेकिंग सोडा टाकावे आणि दहा मिनिटे ठेवावे. नंतर भांडे चांगले घासून स्वच्छ करावे. यामुळे जळकट भांडे स्वच्छ होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com