Kissing Side Effects: अनेक कपल एकमेकांना किस करून समोरच्या व्यक्तीवर आपले प्रेम व्यक्त करतात. तसेच यामुळे पार्टनर्समधील नातंही मजबूत होते. असे मानले जाते की किस हा एक प्रेमळ स्पर्श असुन दोन लोकांमधील नात घट्ट करतं. कदाचित तुम्हाला माहित नसेल की किस केल्याने अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की किस केल्याने तोंडाच्या आजाराचा धोका वाढू शकतो.
जेव्हा तुमचा जोडीदार तोंड योग्य प्रकारे स्वच्छ ठेवत नसेल तर तोंडाचे आजार होउ शकतात. असे मानले जाते की जीवाणूंच्या संपर्कात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला तोडांचा संसर्ग होऊ शकतो.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला किस करता तेव्हा तुमच्या दोन्ही तोंडात सुमारे 80 दशलक्ष बॅक्टेरिया निर्माण होतात. जर तुमचा जोडीदार बराच काळ दंतचिकित्सकाकडे गेला नसेल किंवा तोंडाच्या स्वच्छतेचे पालन करत नसेल तर तुमच्या तोंडात वाईट बॅक्टेरिया येण्याची शक्यता खूप जास्त असते. यामुळे तुम्हाला तोंडाच्या अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.
किस केल्याने तोंडाचे 'हे' आजार होऊ शकतात
तोंडाच्या समस्या अनेक प्रकारच्या असतात. प्रत्येक तोंडाची समस्या धोकादायक असतेच असे नाही. जिवाणू किंवा विषाणूमुळे रोगाचा संसर्ग झाल्यास तोंडाच्या आजारांची लागण होण्याचा धोका जास्त असतो.
तुमचे दात पांढरे आणि स्वच्छ असले तरी तुम्हाला तोंडाच्या आजाराचा सामना करावा लागू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणाला किस केल्याने कोणते आजार पसरतात. कारण या काळात एका व्यक्तीच्या लाळेमध्ये असलेले बॅक्टेरिया दुसऱ्या व्यक्तीच्या तोंडात सहज पोहोचतात.
कॅव्हिटी
कॅव्हिटी सामान्यतः दात किडण्यामुळे होतात. जी स्ट्रेप्टोकोकस म्युटान्स नावाच्या एका विशिष्ट प्रकारच्या जीवाणूमुळे होते. या प्रकारच्या जीवाणूमध्ये एक विशेष प्रकारचे आम्ल तयार होते. जे हळूहळू दातांचे इनॅमल तोडते. त्यामुळे दात खराब होतात. हे वेळीच थांबवले नाही तर एकावेळी एकापेक्षा जास्त दातांवर परिणाम होऊ शकतो. हा जीवाणू लाळेद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे सहज जाऊ शकतो.
अल्सर
किसमुळे सिफलिस नावाचा त्रास होतो. हा एक प्रकारचा तोंडाचा अल्सर आहे. तोंडाचा अल्सर झाल्यास खाण्यापिण्यात त्रास होतो.
गम डिसीज
हिरड्यांना आलेली सूज वेगवेगळ्या प्रजातींच्या बॅक्टेरियामुळे होते. एकदा या जीवाणूचा संसर्ग झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ तोंडाच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. जेव्हा बॅक्टेरिया एखाद्या व्यक्तीच्या हिरड्यांच्या संपर्कात येतात तेव्हा ते एक विष सोडतात. ज्यामुळे हिरड्यांच्या नाजूक त्वचेला त्रास होतो, ज्यामुळे जळजळ होते. त्यामुळे ब्रश करताना हिरड्यांना रक्तस्त्राव होतो आणि तोंडामधुन दुर्गंधी येते.
पीरियडॉन्टल डिसीज
पीरियडॉन्टल डिसीज ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हिरड्याच्या खाली पू तयार होतो. कालांतराने यामुळे जळजळ वाढते आणि हाडांच्या ऊतींवर परिणाम होऊ लागतो. त्यामुळे दातांच्या मुळांना इजा होऊन दात पडू लागतात. प्रौढांमध्ये दात गळण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे पीरियडॉन्टल हा रोग आहे.
हार्पीस इन्फेक्शन
किस केल्यान हार्पीस इन्फेक्शन सारखं व्हायरल इन्फेक्शन होऊ शकतं. यामुळे तोंडाच्या आसपासच्या भागात लाल रंगाचे चट्टे उठतात.
तोंडाची दुर्गंधी घालवण्याचे रामबाण उपाय
लसून तसेच कच्चा कांदा (Onion) जेवताना खाल्ला की तोंडाचा खराब वास जास्त येतो. पोट खराब असल्यावर, अपचन होत असल्यावर तोंडाची दुर्गंधी वाढते. बरेच लोक क्रॅश डाएट किंवा हायड्रेशनची काळजी घेत नाहीत, त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. खाण्याव्यतिरिक्त इतर अनेक आजारांमुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते.
मधुमेह आणि किडनीच्या समस्यांमुळे तोंडातून दुर्गंधी येणे सुरू होते. तोंडाच्या दुर्गंधीला दूर करण्यासाठी काही महत्वाचे आयुर्वेदिक उपाय सांगितले जातात. सकाळी उठल्यानंतर निंबाच्या तसेच लवंगयुक्त टुथपेस्टचा वापर करावा. यामुळे दातही सुरक्षित राहतील आणि कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही.
याशिवाय तुम्ही त्रिफळा पावडर देखील वापरू शकता. किचनमध्ये असलेली बडीशेप ही अशीच एक गोष्ट आहे, ज्याचा वापर करून तोंडातील दुर्गंधी सहज दूर केली जाऊ शकते. बडीशेपबाबत डॉक्टर (Doctor) देखील याचे सेवन करण्याचा सल्ला देतात.
यामुळे तोंडाचा वास तर दूर होतोच पण तो ताजातवाना राहतो. वेलचीच्या वापरानेही तोंड ताजे ठेवता येते. तसेच तोंडाच्या दुर्गंधीची समस्या या उपायांमुळे दूर करणे शक्य होईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.