Goa Carnival 2024: कसा निवडला जातो गोवा कार्निवलमधील 'किंग मोमो'...

Goa Carnival 2024: गोवा कार्निवलमध्ये "किंग मोमो" हा महत्वाचा भाग आहे. किंग मोमो हे एक काल्पनिक पात्र आहे. याला कार्निव्हलचा प्रतीकात्मक राजा मानले जाते.
Goa Carnival 2024
Goa Carnival 2024Dainik Gomantak

Goa Carnival 2024: गोवा कार्निवलमध्ये "किंग मोमो" हा महत्वाचा भाग आहे. किंग मोमो हे एक काल्पनिक पात्र आहे. याला कार्निव्हलचा प्रतीकात्मक राजा मानले जाते. गोवा कार्निवल हा एक वार्षिक उत्सव असून हा गोवा राज्यात होतो, विशेषत: फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणारा हा उत्सव एक चैतन्यशील आणि मनोरंजक वातावरण देतो. लेंटच्या सुरुवातीपूर्वी हा उत्सव होतो.

Goa Carnival 2024
Mangane Recipe: गोव्यातील सणासुदीच्या काळात विशेष महत्व असणाऱ्या 'मणगणेची' जाणून घ्या सोपी रेसिपी

किंग मोमोचा संदेश: 'खा, प्या आणि आनंद घ्या'

किंग मोमो म्हणून ओळखल्या जाणार्‍या एका नाममात्र नेत्याची उत्सवापूर्वी निवड केली जाते, ज्याला चार दिवस राज्य करण्यासाठी राज्याची जबाबदारी दिली जाते. साधारणपणे, जगभरातील प्रथेनुसार, यासाठी लठ्ठ, आनंदी व्यक्तीची निवड केली जाते. गोवा कार्निव्हलचा किंग मोमो 'खा, पियेआनिमज्जकर' अर्थात 'खा, प्या आणि आनंद घ्या' या संदेशासह या कार्निव्हलमध्ये दमदार एन्ट्री करतो.

किंग मोमो हा अत्यंत आनंदी व्यक्तीमत्वाच्या रूपात साकारला जातो. किंग मोमोला कार्निवल कालावधीत उत्सवांच्या अध्यक्षतेचा अधिकार देण्यात आलेला असतो. किंग मोमोचे पात्र शाही पोशाख परिधान केलेल्यापैकी एक असतो, बहुतेकदा कलाकार किंवा स्थानिक व्यक्तिरेखा असतात.

किंग मोमोच्या भूमिकेची कार्निव्हलच्या काही दिवस आधी अधिकृतपणे घोषणा केली जाते. गोवा कार्निव्हलमध्ये, परेड, संगीत, नृत्य आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. गोवा कार्निव्हलच्या चैतन्यमय आणि आनंदी वातावरणातसहभागी होण्यासाठी नक्की एकदा गोवा कार्निव्हलला भेट द्या

गोव्यातील कार्निवलचे महत्त्व

गोवा कार्निव्हल हा एक उत्सव अनेक उद्देश पूर्ण करतो. एकीकडे, ते राज्यात राहणाऱ्या विविध समुदायांच्या लोकांमध्ये एकोपा टिकवुन ठेवण्यासाठी मदत करतो तर दुसरीकडे, तो गोव्याला पर्यटकांचे लोकप्रिय ठिकाण म्हणून प्रस्तुत करते. गोवा कार्निव्हल उत्सवाद्वारे राज्यातील संस्कृती आणि परंपरा दाखवल्या जातात. गोवा कार्निव्हल उत्सव राज्यभरात अनेक ठिकाणी उत्सव साजरा केला जात; मात्र कार्निव्हलचा केंद्रबिंदू पणजी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com