ब्रेकअपनंतर एक्स सोबत मैत्री करणं योग्य की अयोग्य? घ्या जाणून

ब्रेकअपनंतर मैत्रीचे नाते टिकवणे खूपच अवघड असते.
Breakup
BreakupDainik Gomantak
Published on
Updated on

आकर्षण ही अशी गोष्ट आहे जी नातेसंबंध संपल्यानंतरही आपल्याला जोडून ठेवते. अशा परिस्थितीत ब्रेकअपनंतरही मैत्री टिकवून ठेवण्याची इच्छा असणारे बरेच लोक असतात. हे सोपे नसले तरी ब्रेकअपनंतर मैत्रीचे नाते टिकवणे खूपच अवघड असते. जेव्हा तुम्हाला जोडीदाराशिवाय तुमच्या आयुष्यात कमतरता जाणवते तेव्हा आपम हा निर्णय घेतो. बरेच लोक त्यांच्या ब्रेकअपमुळे आनंदी नसताना आणि मित्र बनण्याचा निर्णय घेतात. ब्रेकअपनंतरही (Breakup) जर तुम्ही मैत्रीचे नाते जपले तर काही गोष्टींकडे लक्ष देणे अत्यतं गरजेचे आहे. (it right or wrong to befriend X after a breakup Take knowing)

Breakup
चटपटीत अन् चुरचुरीत व्हेजिटेबल व्हेज खिमा तुम्ही कधी टेस्ट केला का?

1) सर्वच गोष्ट शेअर करू नका

जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत सर्व काही शेअर करता, परंतु ब्रेकअपनंतर तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्ही तुमच्या एक्सबद्दल सर्व काही मित्राला सांगू नये. तुम्ही तुमच्या गोष्टी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तसे करणे कठीण असेल तर एक डायरी बनवा आणि तुमच्या मनातील सर्व गोष्टी त्यात लिहून ठेवा.

2) फक्त खास दिवशीच शुभेच्छा द्या

ब्रेकअपनंतरही मैत्री टिकवायची असेल, तर वाढदिवस किंवा सणासारख्या खास प्रसंगीच तुमच्या एक्सला शुभेच्छा द्या. जर तुमचा एस्क तुमच्यामध्ये इंटरेस्टेड असेल तर तो तुमच्याशी अधिक बोलायला सुरुवात करेल.

Breakup
Hair Care: उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट होतायत? घ्या केसांची अशी काळजी

3) तुमच्या X ला खरोखर मैत्री करायची आहे का?

जर तुम्ही बॅकअप केल्यानंतर मित्र बनवत असाल, तर तुम्ही तुमच्या एक्स व्यक्तीलाही याबाबत निर्णय घेण्याची संधी द्यावी. जर तुम्हाला मैत्री करायची असेल तर त्यालाही ते आवडायला हवे असेही नाहीये. अशा परिस्थितीत, त्याला खरोखरच तुमच्याशी मैत्री करायची आहे की नाही याबद्दल तुमच्या एक्स व्यक्तीशी नक्कीच बोला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com