डान्स करून झटपट करा वेट लॉस

फक्त डान्स (Dance) करून 300 ते 800 कॅलरीज (Calories) बर्न करू शकता.
डान्स केल्याने आरोग्यास फायदा होतो.
डान्स केल्याने आरोग्यास फायदा होतो. Dainik Gomantak
Published on
Updated on

weight loss Tips : देशात माहामारीच्या संकटामुळे मोठ्या प्रमाणात वर्क फ्रॉम होम (Work From Home) सुरू आहे. यामुळे अनेकांचे आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वजन वाढीची समस्या वाढली आहे. आपण घरी राहून देखील वजन कमी करू शकतो. यासाठी सोपा उपाय म्हणजे डान्स (Dance) होय. डान्स करता करता तुम्ही पोटावरची चरबी कमी करू शकता.

वजन कमी करण्यासाठी डान्स (Dance) करणे ही एक खूप सोपी पद्धत आहे. एका अंदाजानुसार तुम्ही फक्त डान्स (Dance) करून 300 ते 800 कॅलरीज (Calories) बर्न करू शकता. दरम्यान तुमचे वजन आणि डान्स करण्याच्या गतीवर अवलंबून असते. असे केल्याने हृदयाचे (Heart)आरोग्य चांगले राहते. तसेच ब्लड प्रेशरसुद्धा (Blood Pressure) नियंत्रणात राहते. डान्स केल्याने आरोग्यास फायदा होतो.

डान्स केल्याने आरोग्यास फायदा होतो.
Health Tips - अर्धा तास पायी चालण्याचे "हे" आहेत फायदे

हिपहॉप डान्स (Hip hop dance) -

हा डान्सचा एक प्रकार आहे. यामुळे शरीरातील सर्व भागांची हालचाल होते. या डान्ससाथी खूप एनर्जी लागते. यामुळे कंबर, बम, आणि अॅब्सचे मसल्स टन करतात. जर तुम्ही नियमीतपणे हिपहॉप करत असाल तर 250 कॅलरी बर्न करता येते.

साल्सा डान्स (Salsa dance) -

साल्सा डान्स हा डान्स प्रकार लॅटिन अमेरिकेतून आला आहे. हा प्रकार केल्याने शरीराचे बरेच वजन कमी करता येते. एक तास हा डान्स केल्याने 420 इतके कॅलरीज बर्न होऊ शकते. खर सांगायचे तर डान्स प्रकार आपल्या पार्टनरसोबत देखील करता येतो.

डान्स केल्याने आरोग्यास फायदा होतो.
Health Tips: फळे खाल्यानंतर घ्यावी ही काळजी-

बेली डान्स (Belly Dance) -

बेली डान्स हा प्रकार विशेष पोटासाठी लाभदायी आहे. कारण यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत मिळते . या डान्स प्रकारात प्रामुख्याने कंबरेच्या खालचा भागाचे अधिक हालचाल होते. तुम्ही हा डान्स प्रकार 1 तास केल्यास 300 कॅलरीज बर्न होऊ शकते.

फ्री स्टाईल डान्स (Freestyle Dance) -

फ्री स्टाईल डान्स हा प्रकार केल्याने आपले शरीर पूर्णपणे फ्री असते. या परकरत तुम्ही एक विशेष मूव्हमेंटमध्ये बांधले गेलील असता. तुम्ही हा डान्स दररोज 30 मिनिटे केला तर तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.

झुम्बा डान्स (Zumba dance) -

वजन कमी करण्यासाठी जुम्बा हा डान्स प्रकार खूप उत्तम आहे. हा डान्स प्रकार एक कार्डिओ वर्कआऊट आहे. यामध्ये रूंबा, साल्सा, हिप हॉप या सर्वच डान्स प्रकारांचा समावेश होतो. यामुळे शरीर तंदुरुस्त राहून आधिक कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com