Health: निद्रानाशामुळे करावा लागू शकतो अनेक आजारांचा सामना; हे उपाय करा अन् निरोगी रहा

Health: आपल्या निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार, व्यायामाबरोबरच पुरेशी झोपदेखील गरजेची असते.
Health
HealthDainik Gomantak
Published on
Updated on

Health: आज धावपळीच्या युगात अनेक आजारांबरोबर निद्रानाश होण्याचे प्रमाणदेखील वाढल्याचे दिसून येत आहे. आपल्या निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार, व्यायामाबरोबरच पुरेशी झोपदेखील गरजेची असते.

पुरेशा झोपेच्याअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. आज जाणून घेऊयात अपुऱ्या झोपेमुळे कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते.

तुमची झोप पूर्ण होत नसेल तर नैराश्यासारख्या गंभीर समस्येला तुम्ही लवकर बळी पडू शकता.त्याचबरोबर वजन वाढणे , अंगावर सूज येणे, हार्मोन्समध्ये असंतुलन, पाळी अनियमित होणे, भुकेची भावना वाढीस लागणे, रक्तातील साखर कमी -जास्त होणे असा समस्यांना तुम्हाला सोमोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Health
Cholesterol Controlling : कोलेस्टेरॉलवर रामबाण उपाय म्हणजे हा चहा; बनवायचा कसा हे घ्या जाणून

याशिवाय बिघडलेल्या झोपेच्या तंत्रामुळे रोगप्रतिकारशक्ती , हार्मोन्सवर अतिरिक्त ताण येतो आणि रोजचे आजारपण मागे लागते.

निरोगी राहण्यासाठी रात्रीची शांत आठ तासांची झोप निरोगी जीवनासाठी अत्यंत महत्वाची असते.त्यासाठी रोजच्या झोपेची वेळ निश्चित करुन ती वेळ पाळणे.झोपण्याआधी उत्तेजक पेय म्हणजेच चहा, कॉफी ,मद्यपान करणे टाळावे.

त्याचबरोबर, झोपेच्या किमान एक तास आधी ब्लू लाइट टाळावी.महत्वाचे म्हणजे खेळती हवा व योग्य अंथरुण व पांघरुण हेही शांत झोपेसाठी मदत करेल. बदाम, किवी, मासे, कॅमोमाईल, केळी , दूध या फळांचा आणि पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतर तुमच्या झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com