Health Tips For Childrens: लहान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी 'या' 5 पदार्थांचा आहारात समावेश करा

Health Tips
Health TipsDainik Gomantak
Published on
Updated on

लहान मुलांना सकस आहार (Healthy Food For Children's) काय द्यावा हे प्रत्येक पालकासमोरचे एक आव्हानच आहे. मुलांचा आहार केवळ आरोग्यदायी नसून चालत नाही तर तो चविष्ट असावा लागतो. पालकांना त्यांच्या मुलांचा आहार निरोगी आणि चविष्ट बनविण्यासाठी योग्य संयोग साधावा लागतो. पालकांना मुलांना सकस आहार देण्याबाबत योग्य माहिती नसते. त्यामुळे मुलांना जे जमेल ते खायला दिले जाते. ज्यामुळे मुलांचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे मुलांना काय खायला द्यावे याबाबत आपण माहिती पाहूयात.

Health Tips
President Draupadi Murmu Speech: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे देशाला उद्देशून पहिले भाषण

तृणधान्य

तृण धान्यात भरपूर फायबर असते. धान्यातून अनेक आवश्यक पोषक घटक मुलांच्या शरीरात जातात. मुलांच्या आहारात दलिया, बार्ली, गहू आणि तपकिरी तांदूळ यांचा समावेश करावा. असा सल्ला मॉम जंक्शनने माहीती दिली आहे.

मुलांना भाज्या खायची सवय लावा

मूल तृणधान्ये खायला लागल्यापासून त्याच्या आहारात फायबर आणि पोषक तत्वांनी युक्त भाज्यांचा समावेश करणे सुरू करा. पालक, बीन्स, ब्रोकोली आणि गाजर यांसारख्या भाज्या मुलांना खायला द्या. या भाज्या पुरी करून द्याव्यात, जेणेकरून मुलांना ते सहज पचता येईल.

Health Tips
Accident: संजीवनी साखर कारखान्याजवळ अपघात: एक ठार

फळे

फळांमध्ये अनेक पोषक घटक असतात. लहान मुलांच्या आहारात दररोज किमान एका फळाचा समावेश करा. फळांमध्ये, केळी, टरबूज आणि सफरचंद यासह बेरी खायला द्या.

कडधान्ये आणि शेंगा

कडधान्ये आणि शेंगा लोह, पोटॅशियम आणि फायबरचा चांगला स्रोत आहेत. यांचा मुलांच्या आहारात समावेश केला जाऊ शकतो. चणे, राजमा, वाटाणे, मुलांसाठी फायदेशीर ठरू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com