ओमिक्रॉनच्या अनेक रुग्णांमध्ये 'हे' एकच लक्षण, 'या' औषधाने होतयात 5 दिवसात बरे

आधीच आजारांनी ग्रासल्यामुळे, त्यांची प्रतिकारशक्ती कोरोनाला रोखण्यासाठी पूर्णपणे सक्षम नाही, त्यामुळे कोरोनाचा त्यांच्यावर अधिक परिणाम होतो.
Omicron variant
Omicron variantDainik Gomantak
Published on
Updated on

देशात ज्या प्रकारे कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये या आजाराबाबत चिंता वाढत आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये लक्षणे कमी दिसून येत आहेत ही दिलासादायक बाब आहे. मोठ्या संख्येने रुग्णांमध्ये एकच लक्षण समोर येत आहे आणि तेही 4-5 दिवसांत बरे होत आहे.

दिल्ली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) चे माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा म्हणतात की ओमिक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांमध्ये लक्षणे फारच कमी दिसून येत आहेत. दोन वर्षांपूर्वी सुरू असलेल्या कोरोनाच्या काळात सर्व नवीन लक्षणे समोर येत होती, परंतु, या नवीन प्रकारातील रुग्णांमध्ये एकच लक्षण ठळकपणे दिसून येत आहे.

Omicron variant
मुलांना लस दिल्यानंतर 'ही' लक्षणे दिसतील, पालकांनी लक्ष देणं आवश्यक

यापैकी बहुतेक रुग्णांना फक्त ताप येत आहे, परंतु तपासणी केल्यावर त्यांना SARS Cove-2 या प्रकाराची लागण झाल्याचे कळते. त्यांना खोकला, घसादुखी, डोकेदुखी अशा समस्या नाहीत.

डॉ. मिश्रा सांगतात की, ओमिक्रॉनच्या (Omicron variant) संसर्गामध्ये केवळ ताप असल्याने त्यांना कोणत्याही विशेष औषधांची गरज नसते, असेही दिसून येत आहे. केवळ पॅरासिटामोलच्या गोळ्या घेतल्याने ते बरे होत आहेत. एवढेच नाही तर त्यांना बरे होण्यासाठी अवघे चार ते पाच दिवस लागत आहेत. यानंतर, अशक्तपणा किंवा इतर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळेच ओमिक्रॉननंतर कोरोना महामारीपासून दिलासा मिळू शकेल, असे आरोग्य तज्ज्ञांना वाटते.

Omicron variant
नेमकी काय आहे शॅम्पेन वाइन...!

डॉ. मिश्रा म्हणतात, ज्या लोकांचे अवयव प्रत्यारोपण झाले आहे, किडनी किंवा यकृताचे आजार आहेत, कर्करोग किंवा हृदयाशी संबंधित समस्या आहेत किंवा जे केमोथेरपी किंवा इतर उपचार घेत आहेत. आधीच आजारांनी ग्रासल्यामुळे, त्यांची प्रतिकारशक्ती (Immunity) कोरोनाला (corona) रोखण्यासाठी पूर्णपणे सक्षम नाही, त्यामुळे कोरोनाचा त्यांच्यावर अधिक परिणाम होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com