छत्तीसगढमधे लग्नाची पत्रिका ठरली अभिमानाची गोष्ट

समाजात नाव व्हावे म्हणून लोक विवध नव्या पद्धतीने लग्न साजरे करण्यासाठी पैसा आणि वेळ खर्च करतात.
wedding invitation
wedding invitationDainik Gomantak
Published on
Updated on

लग्न हा एक मोठा आनंदाचा समारभ मनाला जातो. यात अनेक वस्तूंवर मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. छत्तीसगढमधील (Chhattisgarh) धमतरी शहरात लग्नाचे निमंत्रण (wedding Invitation) पत्र लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे, जि खूपच रोचक असण्यासोबतच छत्तीसगढियाच्या अभिमानाची अनुभूती देते.

* ठेठ छत्तीसगढ़ी भाषेत छापलेली लग्नपत्रिका

धमतरीच्या जलमपूर वॉर्डात राहणारे टिकराम सिन्हा आपल्या मुलाचे लग्न लावत आहेत, त्यामुळे त्यांनी लोकांना निमंत्रण (Invitation) देण्यासाठी निमंत्रण पत्रेही छापली आहेत. हे निमंत्रण पत्र आता धमतरीमध्ये चर्चेत आहे. चर्चेत येण्याचे कारण हे आहे की या कार्डमध्ये शुद्ध आणि टिपिकल छत्तीसगढी भाषेचा वापर करण्यात आला आहे. ज्या लोकांना हे निमंत्रण पत्रे मिळाले आहे त्यांना हे पाहून आनंद आणि अभिमान वाटत आहे.

wedding invitation
Goa Carnival Festival: कार्निव्हल उत्सवात भटक्या कुत्र्यांसाठी खास उपक्रम
Chhattisgarh wedding invitation
Chhattisgarh wedding invitationDainik Gomantak

* असे म्हणतात की भारतात प्रत्येक सहा कोसावर बोलीभाषा बदलते. आपल्या देशात 22 भाषाना मान्यता मिळाली आहे. छत्तीसगढमधील बहुतांश मैदानी भागात छत्तीसगढिया ही बोलीभाषा आहे. यातही की हिंदी, काही ओरिया, काही भोजपूरी शब्द असले तरी त्याचा उच्चार छत्तीसगढियाला वेगळी ओळख देतो. दोन छत्तीसगढि मनसे टिपिकल बोलीभाषेत बोलतात तेव्हा त्याचा गोडवा कानात मधसारखा विरघळतो.

* पत्रिकेमध्ये छत्तीसगढियाचे हे शब्द वापरले

साधारणपणे हिंदी भाषिक भगत लग्नपत्रिका संस्कृत श्लोकांसह साहित्यिक हिंदी शब्दांचा वापर दिसून येतो. काही लोक इंग्लिशमध्ये निमंत्रणे पाठवतात हा त्यांचा अभिमान असतो. पहिल्यांदाच छत्तीसढी निमंत्रण पाठवले आहे. यामध्ये विवहाचे स्थान 'बिहेव',आजोबा यांना 'बबा', वडिलांना 'ददा', आणि आईला 'दाई' असे शब्द वापरले आहेत. ही निमंत्रण पत्रिका तयार करण्यासाठी तीन दिवस लागले आहे अशी माहिती सिन्हा कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com