Goa Carnival Festival: कार्निव्हल उत्सवात भटक्या कुत्र्यांसाठी खास उपक्रम

कार्निव्हल उत्सव फक्त गोव्यात साजरा केला जातो.
Goa Carnival Festival
Goa Carnival FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

कार्निव्हल उत्सव फक्त गोव्यात साजरा केला जातो. गोवा कार्निव्हल, ज्याला व्हिवा कार्निव्हल (Carnival Festival) असेही म्हणतात, दरवर्षी गोव्यात (Goa) हा उत्सव 4 दिवस साजरा केला जातो. हा उत्सव ख्रिश्चन धर्माच्या (Christianity Festivals) लेंटच्या पवित्र कालावधीची सुरूवात करते आणि देशभरातील पर्यटकांसाठी (Tourist) हे एक मोठे आकर्षण ठरले आहे. यावर्षी हा कार्निव्हल (Carnival Festival) 26 फेब्रुवारीला पणजी (Panji) , 27 फेब्रुवारी रोजी मडगाव (Margao) , 28 फेब्रुवारी रोजी वास्को (Vasco) आणि 1 मार्चला म्हापसा (Mapusa) येथे होणार आहे.

गोव्यात (Goa) भटक्या कुत्र्यांसाठी एक खास उपक्रम राबवणार आहेत. यामध्ये उपक्रमामध्ये कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ पणजी (CCP) भटक्या कुत्र्यांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी प्राणीप्रेमींना प्रेरीत करण्यासाठी भटके कुत्रे दत्तक क्षेत्र स्थापन करणार आहेत.

Goa Carnival Festival
Carnival Festival: गोव्यात 26 फेब्रुवारी ते 1 मार्च कार्निव्हल फेस्टिवलची धूम

या वर्षी कार्निव्हलमध्ये (Carnival Festival) आणखी एक आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे भटक्या कुत्र्यांना दत्तक देण्यासाठी स्टॉल लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कुत्र्यांना लसीकरण केले जाते, चांगले खायला देवून दत्तक देण्यासाठी तयार केले जाते. भटक्या कुत्र्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांना आधार देवू शकता असे कॉर्पोरेशन ऑफ सिटी ऑफ पणजी आयुक्त अॅग्नेलो फर्नांडिस (Agnelo Fernandes) यांनी पत्रकार परिषदेमध्ये प्राणीप्रेमींना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. हा निर्णय प्राणीप्रेमींसह (Animal lover) लोकांच्या विनंतीनंतर घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com