Tulsi Vivah 2022: तुळशीविवाहाचं महत्त्व काय ? जाणून घ्या मुहूर्त आणि पूजेची पद्धत

तुळशी विवाह साजरा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते.
Tulsi Vivah 2022
Tulsi Vivah 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते. यामुळेच प्रत्येक घरात तुळशीच्या पूजेचे महत्त्व आहे. तुळशीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला तुलसी विवाह साजरा केला जातो. यावर्षी तुळशी विवाह 05 नोव्हेंबर 2022 रोजी आहे. चला तर मग जाणून घेऊया पूजा पद्धती, मुहूर्त आणि तुळशी विवाहाचे महत्त्व.

Tulsi Vivah 2022
Yoga Tips: रोज करा 'भुजंगासन' चरबीला करा बाय बाय; पचनही सुधारेल

तुळशीविवाह या पद्धतीने साजरा करा

तुळशीविवाहाच्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. तुळशी विवाह पूजा संध्याकाळी केली जाते. यासाठी एक कापड पसरून त्यामध्ये तुळशीचे रोपटं आणि शाळीग्राम ठेवा. तुळशी आणि शाळीग्रामवर गंगाजल शिंपडा. तुळशीजवळ पाण्याने भरलेली फुलदाणी ठेवा आणि तुप घातलेला दिवा लावा. तुळशी आणि शाळीग्रामला चंदनाचा तिलक लावावा.

तुळशीच्या कुंडीला उसाचा मंडप बनवा. तुळशीच्या पानांना तिलक लावा, लाल कपडा अर्पण करून आणि हळदी कुंकू, बांगडी, टिकली इत्यादी वस्तू बनवा. शाळीग्राम हातात ठेऊन तुळशीची प्रदक्षिणा करावी आणि त्यानंतर आरती करावी. पूजा संपल्यानंतर हात जोडून तुळशीमाता आणि भगवान शाळीग्राम यांच्या सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना करा.

Tulsi Vivah 2022
Skin Care Tips: फक्त चवच नाही तर सौंदर्य देखील वाढवते 'दालचिनी' जाणून घ्या कसे

हिंदू धर्मात तुळशी विवाहाला विशेष महत्त्व असून, विवाहित महिलांनी या दिवशी पूजा आणि व्रत करावे. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढते. तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशी आणि शाळीग्राम यांचा विवाह केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते.

तुळशीविवाहाचा मुहूर्त

तुळशी विवाहाची तारीख - शनिवार, 05 नोव्हेंबर 2022 कार्तिक द्वादशी शनिवार 05 नोव्हेंबर 2022 रोजी 06:08 पासून सुरू होते. कार्तिक द्वादशी रविवार 06 नोव्हेंबर 2022 संध्याकाळी 05:06 वाजता संपेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com