Yoga Tips
Yoga TipsDainik Gomantak

Yoga Tips: रोज करा 'भुजंगासन' चरबीला करा बाय बाय; पचनही सुधारेल

लठ्ठपणा कमी करण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यापासून ते पचन सुधारण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर आहे.
Published on

भुजंगासन हा योगाचा प्रकार भुजंग या शब्दापासून आला आहे. भुजंग या शब्दाचा अर्थ नाग असा होतो. भुजंगासन योगाभ्यास करताना शारीराची स्थिती नागासारखी करावी लागते. सूर्यनमस्काराच्या प्रकारातील हे एक आसन आहे. या आसनात पोटावर झोपून शरीराचा पुढचा भाग वर केला जातो. यामुळे पाठ आणि कंबरेच्या स्नायूंचा व्यायाम होतो. रोज न चुकता योगासन केल्यास मानसिकच तसेच, अनेक शारीरिक समस्या कमी होतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी, रक्ताभिसरण सुधारण्यापासून ते पचन सुधारण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर आहे. विशेष म्हणजे भुजंगासन अतिशय सोपे आहे. सर्व वयोगटातील लोक सहजपणे हे आसन करू शकतात.

Bhujangasan
Bhujangasan

भुजंगासन हा योगाचा प्रकार भुजंग या शब्दापासून आला आहे. भुजंग या शब्दाचा अर्थ नाग असा होतो. भुजंगासन योगाभ्यास करताना शरीराची स्थिती नागासारखी करावी लागते. सूर्यनमस्काराच्या प्रकारातील हे एक आसन आहे. या आसनात पोटावर झोपून शरीराचा पुढचा भाग वर केला जातो. यामुळे पाठ आणि कंबरेच्या स्नायूंचा व्यायाम होतो.

Yoga Tips
Chardham Yatra: विक्रमी चारधाम यात्रा! 46 लाख भाविक दाखल, 100 कोटींची कमाई
Fat
Fat

भुजंगासन वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. पोटातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी, स्नायूंची ताकद आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे आसन फायदेशीर मानले जाते. या आसनाच्या सरावाने मेटाबॉलिझमही सुधारते, यामुळे कॅलरीज बर्न होतात. याशिवाय, अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी आणि मणक्याचे स्नायू टोन करण्यासाठी आणि पाठदुखीपासून मुक्त होण्यासाठी भुजंगासन फायदेशीर व्यायाम आहे.

Yoga Tips
Worlds Tallest Shiva: जगातील सर्वात उंच शिवमूर्ती तयार; दहा वर्ष सुरू होते काम

भुजंगासनाच्या नियमित सरावाने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांसाठी देखील कमी होतात. या आसनाच्या नियमित सरावाने पचनसंस्थेची कार्यक्षमता वाढते. ज्यांना बद्धकोष्ठता किंवा पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो, अशा लोकांना भुजंगासनाचा फायदा होऊ शकतो. ज्या लोकांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांना भुजंगासनाच्या सरावाने विशेष फायदा होऊ शकतो. भुजंगासनाचा रोज सराव केल्यास त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com