पावसाळ्यात सारखा चहा प्यावासा वाटत असेल तर ट्राय करा 'हे' ऑप्शन

चहा (Tea) घेतल्यावर आपल्याला फ्रेश (Fresh) वाटते.
ग्रीन टी ही जगातील सर्वात लोकप्रिय चहा आहे.
ग्रीन टी ही जगातील सर्वात लोकप्रिय चहा आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

Health Tips : चहा (Tea) ही एक अशी गोष्ट आहे ज्याच्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही . प्रत्येकाला गरम चहा आणि पाणी आवडते. विशेष म्हणजे पावसाळ्यात तर सगळ्यानांच चहा हवा असतो. चहाच्या (Tea) फायद्याविषयी (Benefits) तर सर्वानाच माहिती असेल. चहा घेतल्यावर आपल्याला फ्रेश वाटते. तसेच दिवसभर ऊर्जा देण्याचे कार्य करते. आजही अनेक लोक नियमितपणे चहा दुधासोबत पितात. परंतु, कदाचित तुम्हाला हे ठाऊक नसेल की बाजारात चहाचे अनेक हेल्डी (Healthy) पर्याय आहेत. जर आपल्याला चहा पिण्याची आवड असेल तर हे हेल्डी पर्याय नक्की वापरुन पहा.

ग्रीन टी ही जगातील सर्वात लोकप्रिय चहा आहे.
Health Tips: फळे खाल्यानंतर घ्यावी ही काळजी-

ग्रीन टी

ग्रीन टी ही जगातील सर्वात लोकप्रिय चहा आहे. हे चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य खूप कमी आहे. ते कॅमेलिया सायनेन्सिसच्या पानांपासून बनविलेले आहे. ऑक्सिडेशन रोखण्यासाठी ही पाने वाळवून शिजवतात. हे वेलची, तुळस , मध, लिंबू, आले, पुदिनाच्या वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये आढळतात. ज्यामुळे आरोग्य चांगले राहते. तसेच लठ्ठपणा कमी करण्याबरोबरच ग्रीन टी अनेक आजारांपासून दूर ठेवते.

ग्रीन टी ही जगातील सर्वात लोकप्रिय चहा आहे.
Health Tips - अर्धा तास पायी चालण्याचे "हे" आहेत फायदे

ग्रीन आईस टी

जर तुम्हाला उन्हाळयात निरोगी आणि फ्रेश राहायचे असेल तर ग्रीन आईस टी पिऊ शकता. यासाठी पाणी उकळावे लागते आणि ग्रीन टी पिशवी मिक्स करावी लागते. सुमारे पाच मिनिटानंतर ते एका कपमध्ये फिल्टर करावे. यानंतर त्यात बर्फाचे तुकडे आणि काही पुदिना पणे घालावीत. तुम्ही साखर किंवा मध देखील घालू शकता. हा चहा प्यायल्याने शरीर हायड्रेट राहील.

ग्रीन टी ही जगातील सर्वात लोकप्रिय चहा आहे.
Health: स्ट्रेस आणि विचारांचं चक्र कस थांबवायचं?

ब्लॅक टी

काळा चहा जगातील एक लोकप्रिय चहा आहे. या चहासोबत आपण आले आणि वेलची पूड वापरू शकता. काळ्या चहाला जपानमध्ये लाल चहा म्हणून ओळखले जाते. हा चहा प्यायल्याने मधुमेह, मूत्रपिंडतील दगड आणि इतर रोगांचा धोका कमी होतो .

ग्रीन टी ही जगातील सर्वात लोकप्रिय चहा आहे.
Health Tips: उपाशीपोटी ‘हे’ पदार्थ तुम्ही खात असाल तर सावधान!

गवती चहा

गावती चहा हा सर्वानाच माहिती आहे. कोरडे औषधी वनस्पती, फळे, फुले, आले, लिंबाचा रस मिसळून हर्बल चहा बनविला जातो. या चहामध्ये कोणत्याही प्रकारची चहाची पाने वापरली जात नाही. या चहावर औषधी वनस्पती आणि फुलांचा वास येतो. नियमित चहापेक्षा हर्बल चहा पिणे अधिक फायदेशीर आहे. तसेच अनेक रोगांपासून दूर ठेवण्यास मदत करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com