Aloe Vera: उन्हामुळे त्वचा टॅन झाल्यास असा करा कोरफडीचा उपयोग

Aloe Vera: कोरफडीमधे सॅलिसिलिक ॲसिड आहे.
Benefits of Aloe Vera
Benefits of Aloe VeraDainik Gomantak
Published on
Updated on

Aloe Vera: आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्याला आरोग्याबाबतच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काही समस्या डॉक्टरांच्या औषोधपचारानंतर कमी होतात तर काही समस्या या औषोधपचरानंतरही या समस्यांचा सामना करावा लागतो.

या समस्या म्हणजे तोंडावर येणारे मुरुम, पडणारे काळे डाग, मोठ्या प्रमाणात गळणारे केस अशा प्रकारचे आहेत. आता अशा समस्यावर कोरफड बऱ्याचदा उपयोगी पडत असलेली दिसून येते. आज आपण कोरफडीचा कोणत्या समस्यांवर काय उपयोग करता येईल हे पाहूयात.

कोरफडीला अजरा अमरा, तरुणी, माता, वीरा अशा प्रकारची नावे आहेत. महिलांना प्रसुतीनंतर होणारी पोटदुखी, अंगावरची सूज लवकर कमी होण्यासाठी काळा बोळ नावाचे औषध दिले जाते. काळा बोळ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कोरफडीच्या पानाचे केलेले औषध आहे. मृदुविरेचक, डाययुरेटिक, बलवर्धक अशा तिच्या अनेक गुणांचा फायदा यामुळे मिळतो.

सुंदर दिसण्यासाठी या कोरफडीचे अनेक उपयोग आपण करु शकतो . मग ते चेहऱ्यावरचे डाग, मुरमाचे फोड, काळसर व्रण असो किंवा केस गळणे, केस कोरडे होणे, केसात कोंडा होणे, चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी कोरफडीचा वापर केला जाऊ शकतो.

कोरफडीमधे सॅलिसिलिक ॲसिड आहे. शिवाय ही कोरफड ॲंटिसेप्टीकही आहे. त्यामुळे आजकाल बाजारात ॲलोवेरा जेल, ॲलोवेरा शांपू, ॲलो क्रीम, मॉइश्चरायझर वापरले जाते. याशिवाय कोरफड कृमिनाशक आहे, त्यामुळे लहान मुलांच्या पोटात जंत झाल्यास कोरफडीपासून तयार केलेले औषध दिले जाते.

महिलांच्या मासिक पाळीच्या त्रासामध्ये रजोदोष नाहीसे करण्यामध्येही कोरफडीचा उपयोग केला जातो. शिवाय आयुर्वेदातील अनेक औषधे तयार करताना कोरफड रस वापरला जातो.

Benefits of Aloe Vera
Breakfast Recipes: रोज तेच-तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळला आहात? ट्राय करा 'ही' नवीन डिश
  • त्वचाविकारांवर अशी उपयोगी पडते कोरफड

कोरफडीचा गर उन्हामुळे त्वचा टॅन झाल्यास चेहऱ्यावर लावल्यास त्वचा उजळण्यास मदत होईल. अनेकजण डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळांमुळे त्रासलेले असतात. डोळ्यांच्या भोवती हा कोरफडीचा गर लावल्यास काळी वर्तुळे घालवण्यास मदत होईल.

याशिवाय, ओठांना क्रॅक्स येत असतील तर ओठांवर, प्रसुतीनंतर डिलिव्हरी स्ट्रेच मार्क असतील तर, किंवा वयात येताना पडणाऱ्या स्ट्रेच मार्कवर, त्वचा कोरडी असेल तर हा कोरफडीचा गर मदत करु शकतो.

अशी ही कोरफड कमी पाण्यावर वाढणारी असल्याने आणि रोजच्या आयुष्यात नेहमीच्या आरोग्याविषयीच्या समस्यांवर उपयोगी पडत असल्याने आपण आपल्या अशी औषधी आणि आयुर्वेदिक कोरफड घराच्या बगीच्यात लावू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com