Breakfast Recipes: रोज तेच-तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन कंटाळला आहात? ट्राय करा 'ही' नवीन डिश

Breakfast Recipes: नवनवीन पदार्थ तयार करुन पाहत असतात.
Breakfast Recipes
Breakfast RecipesDainik Gomantak
Published on
Updated on

Breakfast Recipes: रोज नाश्त्याला काय बनवायचे हा जवळजवळ सगळ्यांच्याच घरातील ठरलेला प्रश्न असतो. अनेकवेळा आपण रोजचे ठरलेले पदार्थ खाऊन कंटाळलेले असतो. अशा वेळी स्वयंपाकाची आवड असलेले अनेकजण नवनवीन पदार्थ तयार करुन पाहत असतात.

असाच एक चविष्ठ पदार्थ कसा बनवायचा हे आपण पाहणार आहोत. हा पदार्थ म्हणजे राजगिऱ्याच्या पिठाचा उपमा. हा उपमा बनविण्यासाठी काय- काय साहित्य लागेल आणि ते साहित्य मिळाल्यानंतर तो कसा बनवायचा याची कृतीदेखील पाहूयात.

  • साहित्य:

    अर्धी वाटी राजगिरा पीठ, मूठभर भाजलेले शेंगदाणे,

  • 1 मध्यम बटाटा, 1 मोठा चमचा साजूक तूप,

  • 1 लहान चमचा जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या,

  • 1 चमचा लिंबाचा रस, चवीपुरते मीठ, साखर.

Breakfast Recipes
Palak Paneer Pakoda Recipe: संध्याकाळच्या नाश्तात बनवा पालक पनीर पकोडा!
  • कृती:

    राजगिऱ्याचे पीठ कोरडे खमंग भाजून घ्या. बटाट्याच्या काचऱ्या चिरून घ्या.

  • तुपात जिरे, मिरचीची फोडणी करा. शेंगदाणे घालून परता. बटाटे परतून घ्या. त्यानंतर राजगिऱ्याचे पीठ घालून परता.

  • उकळते पाणी घालून पीठ शिजवून घ्या.

  • लिंबाचा रस, मीठ, साखर घाला. ओल्या खोबऱ्याने सजवा.

अशा प्रकारे, हा राजगिऱ्याचा उपमा खाण्यासाठी तयार होईल. करायला सोपा आणि खाण्यासाठी चविष्ठ तसेच आरोग्यदायी असणारा हा उपमा उपवासाला चालणारे साहित्य घालून उपवासलादेखील खाऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com