Red Ants Remedy: काही केल्या मुंग्या घरातून हटत नाहीत? मग वापरा 'हे' सोपे उपाय

Remedies For Red Ants: लाल मुंग्या जितक्या लहान दिसतात तितक्या जास्त दहशत निर्माण करतात.
Remedies For Red Ants
Remedies For Red AntsDainik Gomantak
Published on
Updated on

Red Ants Remedy: लाल मुंग्या जितक्या लहान दिसतात तितक्या जास्त दहशत निर्माण करतात. जर या मुंग्या मोठ्या प्रमाणात घरात शिरल्या तर त्या घरात ठेवलेल्या वस्तू खराब करू लागतात.

त्या केवळ खाद्यपदार्थांवरच हल्ला करत नाहीत तर त्यांच्या संपर्कात आल्यावर आपल्याला चावतातही. ज्यामुळे खाज सुटणे आणि जळजळ होण्याची समस्या उद्भवते.

Remedies For Red Ants
Vastu Tips: नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील 'या' गोष्टी त्वरित बाहेर काढून टाका; अन्यथा...

वास्तविक, त्यांना घरापासून दूर नेण्यासाठी बाजारात अनेक कीटकनाशके उपलब्ध आहेत. मात्र, त्यांना न मारता घराबाहेरचा रस्ता दाखवायचा असेल, तर तुम्ही काही सोपे घरगुती उपाय वापरू शकता. चला जाणून घेऊया लाल मुंग्या न मारता घरातून त्यांना कसे बाहेर काढायचे.

घरातून लाल मुंग्या कशा बाहेर काढायच्या....

1. हळद आणि तुरटी: घरातून लाल मुंग्या काढण्यासाठी तुरटी आणि हळद समान प्रमाणात मिसळा आणि नंतर दोन्हीच्या मिश्रणाची पावडर तयार करा. घराच्या ज्या भागात लाल मुंग्या येतात त्या भागांवर ही पावडर टाका. याने मुंग्या येणे कमी होईल

2. लसूण: मुंग्यांना लसणाचा वास अजिबात आवडत नाही. यामुळेच लसणाचा वापर त्यांना घरापासून दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. तुम्हाला फक्त लसूण बारीक करून त्याचा रस काढायचा आहे आणि मग मुंग्या असलेल्या भागावर हा रस फवारायचा आहे.

3. मीठ: खूप कमी लोकांना हे माहीत आहे की, लादी पुसताना पाण्यात थोडेसे मीठ टाकले तर मुंग्या पळवण्यास खूप मदत होते.

4. व्हिनेगर: व्हिनेगर पाण्यामध्ये समान प्रमाणात मिसळा आणि नंतर ज्या ठिकाणी मुंग्या मोठ्या प्रमाणात असतात त्या ठिकाणी फवारणी करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com