Vastu Tips: नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील 'या' गोष्टी त्वरित बाहेर काढून टाका; अन्यथा...

माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते.
Vastu Tips For Navratri Festival
Vastu Tips For Navratri FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Tips For Navratri Festival

देवी लक्ष्मी आपल्या भक्तांची प्रत्येक क्षणी काळजी घेते, परंतु नवरात्रीच्या दिवसात देवीची पूजा करणे विशेष फलदायी आहे. या काळात पूजेचे फायदेही लवकर मिळतात. याचे कारण म्हणजे माता दुर्गा नवरात्रीच्या काळात पृथ्वीवर निवास करते आणि आपल्या भक्तांच्या इच्छा ऐकते.

माता दुर्गेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्री अत्यंत पवित्र मानली जाते. नवरात्रीपूर्वीच लोक घरोघरी तयारीला लागतात. शारदीय नवरात्रीला लवकरच सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला आई अंबेचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काही वस्तू बाहेर टाका, कारण या गोष्टी घरात नकारात्मकता आणतात. चला त्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया

Vastu Tips For Navratri Festival
Pitru Paksha: पितृपक्षातील शनिवारी पिंपळाच्या झाडाला 'या' वस्तु करा अर्पण, अनेक समस्या होतील दूर

तुटलेल्या मूर्ती

कोणत्याही देवाची तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. हे शुभ मानले जात नाही. तुमच्या घरामध्ये भंगलेल्या मूर्ती असतील तर शारदीय नवरात्री सुरू होण्यापूर्वी त्या घरातून काढून पवित्र नदीत टाकाव्यात.

जुने शूज आणि चप्पल

तुमच्या घरात जुने शूज आणि चप्पल पडलेले असतील, जे तुम्ही वापरत नसाल तर नवरात्री सुरू होण्यापूर्वी घरातून काढून टाका. वास्तु तज्ज्ञांच्या मते जुने शूज आणि चप्पल घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते.

फुटलेल्या काचा

तुटलेल्या काचा किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू ठेवल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते, त्यामुळे आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे नवरात्र सुरू होण्यापूर्वी घरातील काचेच्या तुटलेल्या वस्तू काढून टाका.

फाटलेली धार्मिक पुस्तके

वास्तुशास्त्रानुसार फाटलेली धार्मिक पुस्तके कधीही घरात ठेवू नयेत. कोणताही धार्मिक ग्रंथ फाटला असेल तर तो नवरात्रीच्या आधी वाहत्या पाण्यात विसर्जित करावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com