असं म्हणतात की प्रेम हे जात-पात, उच्च-नीच, श्रीमंत-गरीब बघत नाही. अशीच एक हृदयस्पर्शी अनोखी प्रेमकथा मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातून समोर आली आहे. दोघांच्या प्रेमाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात जोरात सुरू आहे. भीक मागून जगणाऱ्या संतोषने पत्नीला मोपेड खरेदी करून भेट दिली आहे. आता दोघेही मोपेडवरूनच भीक मागायला निघतात. संतोष साहू आणि त्यांची पत्नी मुन्नी साहू हे छिंदवाडा जिल्ह्यातील अमरवाडा येथील रहिवासी आहेत. संतोष हा पायाने अपंग आहे. तो भीक मागण्यासाठी ट्रायसायकलवर फिरतो आणि त्याची पत्नी मुन्नीबाई त्याला मदत करते.(hviral video beggar husband wife purchased moped cash 90 thousand rupees chhindwara lclar)
संतोष साहू यांने सांगितले की, ते स्वतः ट्रायसिकलवर बसायचे आणि त्यांची पत्नी धक्का मारायची. अनेकवेळा अशी परिस्थिती यायची की, खराब रस्त्यामुळे बायकोला ट्रायसिकल ढकलणे कठीण झाले. बायकोचा हा त्रास त्याला बघवत नव्हता. अनेकवेळा त्यांची पत्नीही आजारी पडली. तिच्या उपचारासाठी त्यांना खूप पैसे खर्च करावे लागले. एके दिवशी मुन्नीने संतोषला मोपेड घेण्याचा सल्ला दिला. बिकट परिस्थिती पाहून संतोषने कोणत्याही परिस्थितीत पत्नीसाठी मोपेड खरेदी करणारच असा निर्धार केला.
दोघेही बसस्थानक, मंदिर आणि दर्ग्यावर जाऊन भीक मागायचे आणि दररोज सुमारे 300 ते 400 रुपये कमावायचे. यासोबतच दोघांनाही दोन वेळचे जेवण आरामात मिळायचे. अशी पाई जोडून संतोषने चार वर्षांत ९० हजार रुपये जोडले आणि शनिवारी रोख रक्कम देऊन मोपेड खरेदी केली. कोणीतरी त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. ज्याला खूप पसंती दिली जात आहे. आता पती-पत्नी मोपेडवर भीक मागण्यासाठी बाहेर पडतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.