World Turtle Day 2022: दुर्मिळ होत चालले कासव

World Turtle Day: कुणीतरी म्हटले आहे, ‘कासव हा एकही वाईट गोष्ट न करणारा खरा परोपकारी प्राणी आहे.’
World Turtle Day 2022
World Turtle Day 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

वर्तमानपत्रात ‘ऑलिव्ह रिडले कासवांबद्दल सतत छापून येत असल्याने या प्रजातीच्या कासवांबद्दल आणि त्यांना निर्माण झालेल्या धोक्याबद्दल अनेकांना कल्पना आहे. पण धोक्यात असलेली कासवे (Turtle) फक्त हीच नाहीत. शेतात किंवा रानसदृश्य जागांवर देखील जी कासवे आढळतात त्यानाही आज धोका निर्माण झाला आहे. जगाच्या जवळ जवळ सर्व भागांमध्ये आढळणारा हा प्राणी आहे. समुद्राप्रमाणे गोड्या पाण्याच्या साठ्यापाशीही कासवांचे अस्तित्व असते. अनेक ठिकाणी कासवाने, पाळीव प्राणी बनूनही अनेकांना आनंद दिला आहे. (World Turtle Day 2022 News)

समुद्रातली कासवे अनेक समुद्री जीवांचे स्थलांतर घडवून आणण्यास मदत करतात. आपल्या लांबलचक प्रवासात ही कासवे त्या जीवांची वाहतूक, त्यांना आपल्या पाठीवर घेऊन करतात. अनेक मासे भक्ष होण्यापासून वाचण्यासाठी कासवाचा आश्रय घेतात. त्याशिवाय कासव हे कायम कचरा गस्तीवर असणारे उत्कृष्ट सफाई कामगार आहेत. तलाव आणि नद्यांमधील मेलेले मासे (Fish) खाऊन ते पाणी स्वच्छ राखतात. जंगलात (Forest) कासवांनी खोदलेल्या बिळात घुबड, ससे आदी सुमारे 100 हून अधिक प्रजाती आश्रय घेतात. कुणीतरी म्हटले आहे, ‘कासव हा एकही वाईट गोष्ट न करणारा खरा परोपकारी प्राणी आहे.’

World Turtle Day 2022
Healthy Tips: आठवड्यातून एकदा बॉडी डिटॉक्स करणे फायदेशीर

1990 पासून दरवर्षी 23 मे या दिवशी ‘जागतिक कासव दिन’ (World Turtle Day) साजरा केला जातो. कासवाबद्दल लोकांत जागरुकता घडवून आणणे आणि लोकांना कासवांचे महत्त्व पटवून देणे हे या दिवसाचे उद्दिष्ट आहे. अनेक कारणांमुळे कासवांची संख्या कमी होत चालली आहे. त्यात त्यांचे दिसणे दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे.

'मुव्हर्स अ‍ॅण्ड शेकर्स' कासवंबद्दल सुंदर गोष्ट म्हणजे ते कधीही घाईत दिसत नाहीत. फुरसतीचे आयुष्य जगताना ते शांतपणे पाण्यात किंवा जमिनीवर हालचाली करताना दिसतात. तथापि, कासव हे पर्यावरणीय ‘मुव्हर्स अ‍ॅण्ड शेकर्स’ आहेत. आम्हाला वाटते त्यापेक्षाही ते दूर सरकलेले असतात आणि समुद्र आणि जंगल या दोन्ही क्षेत्रात दूरवर मजल मारत असतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com