Stylish Scarf: 'या' पद्धतीने स्कार्फला द्या ट्रेंडी लुक

तुम्ही स्कार्फ विविध आणि सुंदर पद्धतीने घेऊ शकता.
Stylish Scarf |Fashion tips in Marathi
Stylish Scarf |Fashion tips in MarathiDainik Gomantak
Published on
Updated on

स्कार्फचा वापर गळ्यात घालण्यांसाठी केला जातो. बदलत्या ऋतुनुसार तुम्ही फॅब्रिकची निवड करू शकता. हिवाळ्यात सर्दी टाळण्यासाठी आणि उन्हाळ्यात स्कार्फ वापरू शकता. तुम्ही तुमच्या ड्रेसनुसार त्याचा रंग निवडू शकता. तुम्ही स्कार्फ अनेक प्रकारे घेऊ शकता. यामुळे तुमच्या साध्या ड्रेसलासुद्धा स्टायलिश लुक (Stylish Look) मिळतो. स्कार्फ (Scarf) मुलांसाठी आणि मुलींसाठी मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. मुली स्कार्फ अनेक प्रकारे कॅरी करू शकतात. जाणून घेऊया ट्रेंडी प्रकार कोणते आहेत. (Fashion Tips in Marathi)

* हेडबॅंड म्हणून वापर

स्कार्फचा (Scarf) तुम्ही हेडबॅंड म्हणून देखील वापर करू शकता. हा लुक कॅज्युअल ते पार्टीपर्यंत करी करू शकता. यासाठी केसांना नीट करून स्कार्फ गुंडाळू शकता. सध्या स्कार्फएवजी तुम्ही प्रिंटेड स्कार्फ करी करू शकता.

* नेक रॅप

तुमच्या आऊटफिटला स्टायलिश लुक देण्यासाठी तुम्ही गळ्यात स्कार्फ घालू शकता. यासाठी चौकोनी दुपट्टा घ्या. नंतर त्याला तिरपे करावे. मानेवर गळ्यात गुंडाळा. यामुळे तुम्हाला स्टायलिश लुक मिळतो.

Stylish Scarf |Fashion tips in Marathi
Health Tips For Women: मासिक पाळीत 'हे' पदार्थ खाऊन, घ्या स्वत:ची काळजी

* हॅंडबॅग ऍक्सेसरी म्हणून स्कार्फचा वापर

तुम्ही हॅंडबॅग ऍक्सेसरी म्हणून स्कार्फचा वापर करू शकता. तुम्ही तुमच्या बॅगच्या हँडलच्या बाजूला बांधू शकता. हे तुमच्या हँडबॅगच्या (Handbag) हँडलला कलरफूल लुक देतो.

* जॅकेट म्हणून स्कार्फचा वापर

स्कार्फला तुम्ही जॅकेटसारखे (Jacket) वापरू शकता. एकदा फोल्ड करावे. नंतर डोणगी टोक जोडावे आणि त्यांना एकत्र बांधा, जेणेकरून ते हातात घालत येते. नंतर ते मागे घेऊन जॅकेटसारखे घालत येईल.

* स्कार्फचा वापर पोनिटेलसाठी

तुम्ही पोनिटेलसाठी स्कार्फचा वापर करू शकता. यासाठी केसांची पोनिटेल बनवावी. नंतर केस बांधण्यासाठी स्कार्फ वापरू शकता. यामुळे तुम्हाला सुंदर लुक मिळतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com