Tea Stains : कपड्यांवरचा चहाचा डाग दूर करा या सोप्या घरगुती उपायांनी

अनेकदा चहा पिताना किंवा सर्व्ह करताना तो सांडून आपल्या कपड्यांवर पडतो, पांढरा शर्ट असेल तर त्याचे डाग आणखी खोलवर दिसू लागतात
Tea Stains on White Clothes
Tea Stains on White ClothesDainik Gomantak
Published on
Updated on

भारतातील चहाप्रेमींची संख्या अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक चहाचे घोट घ्यायला विसरत नाहीत. या छंदात अनेक वेळा अशा समस्या येतात, ज्याचे निराकरण शोधणे कठीण आहे. अनेकदा चहा पिताना किंवा सर्व्ह करताना तो सांडून आपल्या कपड्यांवर पडतो, पांढरा शर्ट असेल तर त्याचे डाग आणखी खोलवर दिसू लागतात, आपण पटकन तो पाण्याने धुतो, पण कधी-कधी हा डाग निघता निघत नाही. कपड्यांवरील चहाचे डाग कसे घालवायचे ते जाणून घेऊया.

Tea Stains on White Clothes
Sleeps Problems : झोपेची कमतरता ठरू शकते अनेक आजारांचे कारण; जाणून घ्या

कपड्यांवरील चहाच्या डागांपासून मुक्त कसे करावे?

कॉटन शिफॉन आणि पॉलिस्टर कपडे

  • अशा प्रकारच्या कपड्यांपासून चहाचे डाग दूर करायचे असतील तर ते कोमट पाण्याने ओले करा.

  • चहा सांडल्यानंतर तुम्ही हे जितक्या लवकर कराल तितका चांगला परिणाम होईल.

  • यानंतर डागावर बेकिंग सोडा लावून हातांनी चोळा.

  • आता काही वेळ पाण्यात सोडा

  • नंतर टबमध्ये वॉशिंग पावडर टाका आणि भिजण्यासाठी सोडा

  • नंतर डागभोवती हाताने चोळा आणि नंतर पाण्याने धुवून उन्हात वाळवा

लोकरीचे आणि रेशमी कपडे

  • अशा कपड्यांवरील चहाच्या डागांपासूनही तुम्ही सहज सुटका करू शकता.

  • यासाठी स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर ओतून भरा.

  • आता चहाच्या डागावर स्प्रे करा आणि हाताने घासून घ्या

  • आता काही वेळ पाण्यात भिजत राहू द्या

  • आता ब्रशच्या मदतीने ते हलकेच घासून घ्या

  • आता पाण्याने धुवून उन्हात वाळवा.

पांढरा सदरा

पांढर्‍या शर्टवरील चहाचे डाग अगदी हट्टी असतात, परंतु लिंबू आणि बेकिंग सोडाच्या मदतीने आपण सहजपणे त्यापासून मुक्त होऊ शकता. या दोन्ही गोष्टी एका भांड्यात ठेवा आणि मिक्स करा. नंतर ब्रश किंवा पिळून घेतलेल्या लिंबाच्या मदतीने डागावर घासून थोडावेळ राहू द्या. तुम्ही ते स्वच्छ पाणी आणि वॉशिंग पावडरच्या मदतीने धुवा आणि शेवटी उन्हात वाळवा. तरीही थोडासा डाग दिसत असल्यास, ही प्रक्रिया पुन्हा करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com