Rawa Kachori Recipe
Rawa Kachori RecipeDainik Gomantak

Rawa Kachori Recipe: 'रवा कचोरी' चा संध्याकाळच्या नाश्त्यात घ्या आस्वाद

रवा कचोरीची रेसिपी बनवायला खुप सोपी असुन ही डिश तुम्ही सकाळ किंवा संध्यकाळच्या नाश्त्यात बनउ शकता.
Published on

Evening Snacks Recipe: तुम्ही रव्यापासून बनवलेले उपीट, ढोकळा यासारख्या पदार्थांचा आस्वाद घेतला असेल, पण तुम्ही कधी रवा कचोरी रेसिपी करून पाहिली आहे का? जर नसेल तर यावेळी तुम्ही नाश्त्यात रवा कचोरीची ट्राय करु पाहा.ही रेसिपी बनवायला खुप सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया रवा कचोरीची कशी बनवायची.

  • लागणारे साहित्य कोणते

एक वाटी रवा

एक ग्लास पाणी

अर्धा चमचा चिली फ्लेक्स

दोन उकडलेले बटाटे

एक शिमला मिरची

एक गाजर

कोथिंबीर

अर्धा चमचा लाल तिखट

अर्धा चमचा धनेपूड

अर्धा चमचा जिरेपूड

आवश्यक तेल

मीठ गरजेनुसार

Rawa Kachori Recipe
Fitness Tips: फिट अन् ग्लॅमरस दिसायचे असेल तर फक्त 10 मिनिट करा 'हे' वर्कआउट्स
  • कृती

रवा कचोरी बनवण्यासाठी प्रथम सर्व भाज्या नीट धुवून बारीक चिरून घ्या.

आता एका कढईत पाणी गरम करून त्यात चिली फ्लेक्स टाका, नंतर दोन चमचे तेल घाला.

यानंतर पाण्यात मीठ आणि रवा टाका.

नंतर सर्व पाणी सुटेपर्यंत रवा ढवळत राहा.

आता हे रव्याचे पीठ करून बाजूला ठेवा.

नंतर उकडलेले बटाटे मॅश करून त्यात चिरलेली सिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, मीठ, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड घालून चांगले मिक्स करून सारण तयार करा.

नंतर रव्याच्या पिठाचा मोठा गोळा घेऊन त्यात एक चमचा सारण भरून कचोरीचा आकार द्या.

आता कढईत तेल गरम करून त्यात कचोऱ्या तळून घ्या.

तुमची गरमागरम रवा कचोरी तयार आहे.

तुम्ही टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com