Fitness Tips: फिट अन् ग्लॅमरस दिसायचे असेल तर फक्त 10 मिनिट करा 'हे' वर्कआउट्स

वजन कमी करण्यासाठी अनेक व्यायाम आहेत. पण आज आम्ही तुम्हाला बी-टाऊनच्या अभिनेत्रींच्या काही वेगळ्या आणि अतिशय खास वर्कआउट्सबद्दल सांगणार आहोत.
yoga day
yoga dayDainik Gomantak
Published on
Updated on

Fitness Tips: मलायका अरोरा पासून शिल्पा शेट्टी पर्यंत प्रत्येकजण फिट राहण्यासाठी वर्कआउट करत असातात. तसेच त्या चाहत्यांसह सोशल मीडियाद्वारे शेअर करतात. आज आम्ही असाच काही वर्कआउटबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही देखील बॉलिवुड अभिनेत्रांसारखे फिट दिसु शकता.

  • योगा

शिल्पा शेट्टीपासून मलायका अरोरापर्यंत ती फिट राहण्यासाठी तिच्या रोजच्या दिनक्रमात योगा करते. योग हा मलायका अरोरा आणि शिल्पा शेट्टीचा आवडता व्यायाम आहे. फिट राहण्यासाठी शिल्पा त्रिकोनासन करते.

मलायका सूर्यनमस्कार, अष्टांग विन्यास योग प्रकार करते. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, फिट राहण्यासाठी तुम्हाला तासनतास योगा करण्याची गरज नाही. जर तुम्ही फक्त 10 मिनिटे योगासने केलीत तर तुम्हाला त्याचे परिणाम मिळू शकतात.

  • पाइलेट्स 

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ , दीपिका पदुकोण, जान्हवी कपूर आलिया भट्ट यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत फिट राहण्यासाठी पिलेट्स करतात. शरीरात लवचिकता वाढवणारा हा व्यायाम आहे. 

yoga day
Healthy Tips: शरीराला दुर्गंधी येत असेल तर असू शकतात 'हे' गंभीर आजार
  • बॉक्सिंग

कियारा अडवाणीपासून ते रकुल प्रीत सिंगपर्यंत ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी आणि शरीर मजबूत करण्यासाठी बॉक्सिंग करते. हे बॉक्सिंग आहे या अभिनेत्रींच्या फिटनेसचे रहस्य.बॉक्सिंग करताना तुमचे संपूर्ण शरीर कठोर परिश्रम करते. यामुळे कॅलरीज बर्न होण्यासोबतच स्नायू मजबूत होतात आणि शरीर टोन होऊ लागते.

  • वेटलिफ्टिंग

अनुष्का शर्मा फिटनेससाठी वेट ट्रेनिंग किंवा वेटलिफ्टिंग करते. यामुळे आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. हे शरीरात जमा झालेली चरबी कमी करण्यासाठी आणि स्नायू तयार करण्यासाठी चांगले कार्य करते. तसेच हृदयाच्या आरोग्याची काळजी घेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com