Holi Hacks: हर्बल रंग बनवण्यासाठी 'या' गोष्टींचा करा वापर

हर्बल रंगांचा (Herbal Colors) वापर करून घ्या होळीचा आनंद
Holi Special, How To Make Holi Colours At Home in Marathi, How To Make Eco Friendly Homemade Holi Color at Home
Holi Special, How To Make Holi Colours At Home in Marathi, How To Make Eco Friendly Homemade Holi Color at Home Dainik Gomantak
Published on
Updated on

होळी (Holi) हा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. मार्केट विवध रंगानी आणि फुग्यांनी सजलेले आहे. पण जर तुम्हाला केमिकलयुक्त रंगांचा (Colors) वापर करायचा नसेल तर तुम्ही घरीच हर्बल रंगांचा (Herbal Colors) वापर करून होळी खेळू शकता. या रंगांचा वापर केल्याने तुम्हाला त्वचे संबंधित आजार देखील होणार नाही. (How To Make Eco Friendly Homemade Holi Color at Home)

* हिरवा रंग

हिरव्या रंगाचा गुलाल बनवण्यासाठी कडूलिंबाची पाने वाळवून बारीक करून मग त्याची पावडर किंवा पेस्ट तयार करावी. कडूलिंबाचा वापर त्वचेसाठी (Skin) खूप फायदेशीर मनाला जातो. कडूलिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि ऍलर्जीक गुणधर्म असतात ज्यामुळे मुरूम, काले डाग यासारख्या समस्यांपासून बचाव होतो. तसेच तुम्ही पालकाच्या पानांचा वापर देखील करू शकता.

* केशरी रंग

केशरी रंग करण्यासाठी तुम्ही पलशाच्या फुलांचा वापर करू शकता. यासाठी होळीच्या (Holi) एक दिवस आधी रात्री पाण्यात पलाशची फुले टाकावीत. सकाळी फुले पाण्यातून काढून टाका. तुमचा केशरी रंग तयार आहे.

Holi Special, How To Make Holi Colours At Home in Marathi, How To Make Eco Friendly Homemade Holi Color at Home
'या' सवयींमुळे हाडे होतात कमजोर

* गुलाबी रंग

गुलाबी किंवा लाल रंग तयार करण्यासाठी तुम्ही बीटरूटचा वापर करू शकता. जर तुम्हाला गुलाबी रंग तयार करायचा असेल तर बीट वाळवून बारीक करून पावडर तयार करावी. तसेच बीटरूट बारीक करून पाण्यात उकळल्यास लाल रंग तयार होतो.

* पिवळा रंग

पिवळा रंग तयार करण्यासाठी तुम्ही हळदीचा वापर करू शकता. पण हळदीचा वापर अधिक झाल्यास त्वचेवर जळजळ होऊ शकते. हा रंग तयार करण्यासाठी तांदूळ किंवा ज्वारीचे पीठ तयार करून त्यात थोडे पाणी मिक्स केल्यास पिवळा रंग तयार होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com