Healthy Tips: मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यदायी मानले जाते. अनेकांना रोज रिकाम्या पोटी खात असतात. कारण त्यात भरपूर फायबर असते जे पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. तसेच सर्व आजारांचा संबंध पोटाशी असतो, त्यामुळे पोट स्वच्छ असेल तर सर्व आजार तुमच्यापासून दूर राहतात.
पण तुम्हाला माहीत आहे का की मोड खाण्याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. म्हणजेच मोड आलेले मूग फायदेशीर तर आहेच पण आरोग्यासाठीही हानिकारक देखील आहे.
अमेरिकन हेल्थ एजन्सी सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, कोणत्याही प्रकारचे स्प्राउट्स कधीही कच्चे खाऊ नये कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
कच्या स्प्राउट्समध्ये बॅक्टेरिया असतात
'यूएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन' (FDA) नुसार, कच्चे अंकुर आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतात. बियांपासून अंकुर वाढतात. E.coli आणि साल्मोनेला सारखे धोकादायक जीवाणू मोड येण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत वाढू लागतात.
हा जीवाणू कोणत्याही गोष्टीवर फार लवकर हल्ला करतो. या अंकुरांमध्ये बॅक्टेरियाचा धोका सर्वाधिक असतो. FDA च्या म्हणण्यानुसार, जर आधीच बियांच्या बाहेर आणि बियामध्ये कोणतेही जीवाणू असतील. त्यामुळे मोड येण्याच्या प्रक्रियेत ते खूप वेगाने वाढू लागते. घरी देखील मोड आणलेल्या पदार्थांमध्ये हा धोका असतो.
मोड आलेले कच्चे कडधान्य खाल्यास पोटाची समस्या
सीडीसीच्या मते, कच्चे स्प्राउट्स खाल्ल्याने अन्न विषबाधा होण्याचा धोका खूप जास्त असतो. जर तुम्ही ते चांगले शिजवले नाही तर तुम्हाला बॅक्टेरियाचे नुकसान सहन करावे लागेल. स्प्राउट्स शिजवताना त्यातील सर्व जीवाणू मरतात आणि पोटाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
'एफडीए'चा विशेष सल्ला आहे की, मोड आलेले कडधान्य खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने चांगले धुवावेत. यामुळे बॅक्टेरिया दूर होतात. पण फक्त धुवून चालणार नाही, जर तुम्हाला अंकुरातील बॅक्टेरिया मारायचा असेल तर तुम्हाला ते व्यवस्थित शिजवावे लागेल.
तरच ते खाण्यास योग्य होईल. सीडीसीच्या मते, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांना अन्नातून विषबाधा होण्याचा सर्वाधिक धोका असतो. तसेच, लोकांनी कधीही कच्च्या भाज्या किंवा मोड आलेले कडधान्य खाऊ नये, ज्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होउ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.