Headache Causes: रोज डोकं दुखण्यामागे असू शकतात 'ही' 8 कारणं

तुमचेही रोज डोकं दुखत असेल तर जाणून घ्या काय करावे.
Headache Causes
Headache CausesDainik Gomantak
Published on
Updated on

Headache Causes: डोकेदुखीचा त्रास हा एक सामान्य आजार आहे. डोकेदुखीमुळे लोक अनेकदा त्रस्त असतात. मात्र, डोकेदुखीमागे एकच नाही तर अनेक कारणे असू शकतात.

वेगवेगळ्या कारणांमुळे होणारी डोकेदुखी वेगवेगळ्या प्रकारे बरी होऊ शकते. नेहमी डोकेदुखीची समस्या असेल तर ती गंभीर असू शकते. जाणून घेऊया डोकेदुखी मागे कोणती कारणे असू शकतात.

  • झोप न येणे

एखाद्या व्यक्तीला पुरेशी झोप न मिळाल्यासही त्याला डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. जर तुमची लाइफस्टाइल अशी असेल की तुम्ही 7-8 तासांची झोप पूर्ण करू शकत नसाल तर हे तुमच्या रोजच्या डोकेदुखीचे कारण असू शकते. अपुऱ्या झोपेमुळे देखील डोकेदुखी वाडू शकते.

  • कॉफी पिणे

अनेक लोक सकाळची सुरूवात ही कॉफीने करतात. कॉफीचे अतिसेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तसेच यामुळे डोकेदुखीची देखील समस्या वाढू शकते.

  • कमकुवत डोळे

कमजोर डोळ्यांमुळे डोक्यावर ताण येतो. अशावेळी दृष्टी कमकुवत झाल्यामुळे डोकेदुखीची समस्या देखील वाढते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळ्यांच्या ताणामुळे डोकेदुखी झाल्यास डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

  • अति औषध घेणे

अनेक वेळा लोक अति औषध घेतात. पेन किलरसारख्या औषधांच्या अतिवापरामुळे डोकेदुखी देखील तीव्र होऊ शकते. यामुळे औषधांचा वापर शक्यतो टाळावा.

  • गर्दी-गोंगोट

जर तुम्ही अशा वातावरणात राहत असाल जिथे आजूबाजूला खूप गोंगाट आहे, तर हे तुमच्या रोजच्या डोकेदुखीचे कारण असू शकते. यामुळे अशा वातावरणात राहणे टाळावे. अन्यथा डोकेदुखीची समस्या वाढू शकते.

  • डिहायड्रेशन

कधीकधी पुरेसे पाणी न पिल्याने देखील डोकेदुखी होऊ शकते. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशन होते. ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. जास्त मद्यपान केल्याने डोकेदुखी देखील होते. दारू पिल्याने डिहायड्रेशनची समस्या वाढते.

  • सायनस

सायनसची समस्या असलेल्या लोकांना तीव्र डोकेदुखीचा त्रास होतो. सायनसमध्ये डोकेदुखीसोबतच चेहऱ्यावरही वेदना होतात. हे टाळण्यासाठी सायनसवर उपचार घ्यावा. तुम्हाला हवे असल्यास हलक्या कोमट कापडाने शेक द्यावा. यामुळे दुखण्यापासून आराम मिळू शकतो.

  • चिंता

एखाद्या गोष्टीबद्दल खूप काळजी करणे किंवा त्याबद्दल विचार करणे हे देखील डोकेदुखीचे कारण असू शकते. जास्त ताणामुळे झोप येत नाही ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते. अशावेळी चिंता आणि तणाव शक्यतो टाळला पाहिजे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com