Ghee Consumption: आरोग्यासाठी तूप तारक की मारक, वाचा एका क्लिकवर

Ghee Benefits: पण जेवणात तूप किती घ्यावे हा मोठा प्रश्न आहे.
Ghee Benefits
Ghee BenefitsDainik Gomantak
Published on
Updated on

अनेक लोक वजन वाढते म्हणून तुप खाणे टाळतात. तूप खाल्ल्याने वजन वाढेल असा लोकांचा समज होता.पण सध्या परिस्थिती वेगळी आहे. तूप हे आता सुपरफूड मानले जात असून काही प्रमाणात तूप शरीरासाठी फायदेशीर आहे. पण किती प्रमाणात तूप आरोग्यासाठी चांगले, असा प्रश्न अनेकवेळा उपस्थित होतो.

  • कमी किंवा जास्त नाही

तुपाचे (Ghee) अंदाजे योग्य प्रमाण सांगणे थोडे कठीण आहे. तूप इतके असावे की जेवणाची चव वाढेल पण फक्त तुपाची चव येऊ नये, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. उदाहरणार्थ, जिथे डाळ-भात, खिचडी वगैरेमध्ये तूप कमी असते, तिथे पुरणपोळी किंवा हलव्यात थोडं जास्त असते.

  • किती चमचे ठीक आहे

दिवसातून तीन ते पाच चमचे तूप खाऊ शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळी जास्त तूप खाऊ नका. रोजच्या जेवणात थोडे तूप घाला. न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात एक चमचा तूप घेतल्यास चांगले होईल.

Ghee Benefits
Watch Video: अरे हा तर भारताचा स्पाइडरमॅन! ट्रेनमधला व्हिडिओ झाला व्हायरल
  • जेवणात तुपाचे सेवन

तुपाचे सेवन काही खाद्यपदार्थात खातांनाच करावे. काही लोक दिवसाची सुरुवात चमचाभर तूप पिऊन करतात. असे तूप खाण्याची गरज नाही, परंतु कोणत्याही खाद्यपदार्थात घातल्यानंतरच त्याचा वापर करा.

  • अजून बरेच फायदे

तूप खाल्ल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.

शरीराचे सांधेही व्यवस्थित काम करतात.

हृदयाच्या आरोग्यापासून ते चांगले कोलेस्ट्रॉल बनवण्यापर्यंत, तुपाचा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.

यासोबतच बद्धकोष्ठतेवरही तूप चांगले काम करते.

चेहर्‍यावर मसाज केल्याने चेहरा उजळतो, तर सामान्य कोरडेपणाही दूर होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com