Kasturi Meth: घरीच बनवा सुगंधी कस्तुरी मेथी, जाणून घ्या सोपी रेसिपी

Kitchen Hacks: जर तुम्ही जेवणात कस्तुरी मेथीचा वापर करत असाल तर हिवाळ्यात येणाऱ्या हिरव्या मेथीपासून तुम्ही घरी सहज कस्तुरी मेथी बनवू शकता.
Kasturi Meth
Kasturi MethDainik Gomantak
Published on
Updated on

Home Made Kasturi Meth: कस्तुरी मेथी (Kasturi Meth) जेवणात वापरल्यास भाजीची चव दुप्पट होते. कसुरी मेथी वर्षभर खराब होत नाही. उन्हाळ्यात कोथिंबीर क्वचितच मिळते तेव्हा भाजीत कस्तुरी मेथी घातल्याने रंग आणि चव दोन्ही अधिक वाढते. कस्तुरी मेथी हॉटेलमध्ये भाज्यांची चव वाढवण्यासाठी वापरतात. खासकरून लोक कस्तुरी मेथी रस्सा भाजीसाठी याचा वापर करतात.

तुम्ही कस्तुरी मेथीपासून पराठे, पुरी किंवा मथरी देखील बनवू शकता. बहुतेक घरांमध्ये फक्त बाजारातून येणारी कस्तुरी मेथी वापरली जाते. पण जर तुम्हाला हवे असेल तर जेव्हा हिवाळ्यात (Winter) मेथीचा हंगाम असतो तेव्हा तुम्ही घरी सहज कसुरी मेथी बनवू शकता. मेथीपासून लगेच कस्तुरी मेथी बनवायची असेल तर मायक्रोवेव्हमध्ये अवघ्या 5 मिनिटांत कस्तुरी मेथी तयार होईल. जाणून घ्या घरी कशी बनवायची कस्तुरी मेथी.

Kasturi Meth
Yoga For Hair Growth : केसांसाठी 'ही' योगासने आहेत वरदान; वाढीला मिळते चालना

कसुरी मेथी घरी कशी बनवायची 

  • हिवाळा सुरू होताच हिरवी मेथी बाजारात येऊ लागते. कस्तुरी मेथी बनवण्यासाठी हिरव्या मेथीची पाने घ्यावी. 

  • पानांचे देठ काढून टाकल्यानंतर निवडलेली मेथी 2-3 वेळा पाण्याने चांगली धुवावी.

  • चाळणीवर किंवा जाड कापडावर वाळवा. मेथी कोरडी झाल्यावर मायक्रोवेव्ह ट्रेवर पसरवा. 

  • साधारण 3 मिनिटे मायक्रोवेव्ह हाय गॅसवर चालवा आणि मग ट्रे बाहेर काढून मेथी फिरवा. 

  • मेथीला आणखी 3 मिनिटे मायक्रोवेव्ह करा आणि पुन्हा वाळवा. जास्त आचेवर आणखी 2 मिनिटे मायक्रोवेव्ह करा.

  • यानंतर, मेथी थोडी थंड होऊ द्या आणि नंतर हाताने ठेचून घ्या. आता ते हवाबंद डब्यात ठेवा. 

  • अशा प्रकारे तयार केलेली कस्तुरी मेथी वर्षभर सहज टिकते. त्यात सुगंधही असेल. 

  • तुमच्या घरात मायक्रोवेव्ह नसला तरी तुम्ही सहज कस्तुरी मेथी बनवू शकता. 

  • यासाठी मेथी साफ करून त्याची पाने काढून वर्तमानपत्रावर पसरवा. 

  • आता पंख्याच्या हवेत सुकू द्या. मेथी सुकली की थोडावेळ उन्हात ठेवा. त्यामुळे ठेचणे सोपे जाईल. आता हवा बंद डब्यात करून ठेवा. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com