Unlocking Mobile Phone: लॉक झालेला अँड्रॉईड फोन असा करा 'अनलॉक'

अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरच्या माध्यमातून असा करा फोन अनलॉक
how to unlock your Android Phone

how to unlock your Android Phone

Dainik Gomantak

Published on
Updated on

आपला फोन सुरक्षित ठेवण्यासाठी आपण फोनला (Android Phone) लॉक पॅटर्न ठेवतो. यामुळे आपला फोन सुरक्षित राहतो आणि आपले फोटो किंवा त्यातील वैयक्तिक डेटाही चुकीच्या हातांमध्ये जात नाही. जवळपास सर्वच स्मार्टफोन्सना लॉक पॅटर्न अनिवार्य असतं. ज्याच्या मदतीने आपला फोन चोरीला गेल्यासही त्यातील माहिती चोरट्याला मिळत नाही. मात्र जर तुमचा फोनचा अनलॉक पॅटर्न तुम्ही विसरलात तर काय होईल?

how to unlock your Android Phone

आता व्हॉट्सअ‍ॅपवर जवळच्या रेस्टॉरंटचा घेता येणार शोध!

अनेकदा आपला फोनचा अनलॉक पॅटर्न आपण विसरतो किंवा आपला मित्र गमतीने आपला फोन लॉक करतो. अशावेळी आपला फोन अनलॉक कसा करायचा हा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र याचं सहज आणि सोपं साधन आहे ते म्हणजे अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर. मात्र हे अॅप (App) आधीपासून आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे.

how to unlock your Android Phone

New Year: एटीएममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार ज्यादा पैसे !

अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजरच्या माध्यमातून असा करा फोन अनलॉक

1. अँड्रॉईड डिव्हाईस मॅनेजर तुमच्या फोनमध्ये आधीपासूनच इन्स्टॉल असल्यास त्याचा सेटअप तुमच्या जीमेल अकाऊंटने केलेला असणे गरजेचे आहे. त्यामुळे फोन अनलॉक (Unlock) करणं आणखी सोपं होतं.

2. तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलच्या ब्राऊझरमध्ये जाऊन google.com/android/devicemanager या लिंकवर जा.

3. या पेजवर त्याच जीमेल आयडीने लॉगिन करा ज्यावरुन तुमचा लॉक झालेला अँड्रॉईडचा फोन सेटअप केलेला आहे.

4. लॉगिन केल्यानंतर ते डिव्हाईस निवडा ज्यावरुन तुम्हाला अनलॉक पॅटर्न हटवायचा आहे.

5. यानंतर ‘Lock’ हा ऑप्शन सिलेक्ट करा.

6. आता एक पॉपअप विंडो उघडेल, ज्यावर एक तात्पुरता पासवर्ड टाकावा लागेल. रिकव्हरी मेसेज आणि फोन नंबर देणं यासाठी बंधनकारक नसेल. आता पुन्हा ‘Lock’ हा पर्याय निवडा.

7. जर तुम्ही तुमचा फोन या पद्धतीने अनलॉक करु शकला, तर तुम्हाला रिंग, लॉक आणि इरेज बटणाखाली बॉक्समध्ये एक मेसेज लिहिलेला दिसेल.

8. यानंतर तुम्हाला एक पासवर्ड फील्ड दिसेल, यामध्ये तुम्ही निवडलेला तात्पुरता पासवर्ड घालावा लागेल. याचा वापर करुन तुम्ही फोन सहज अनलॉक करु शकता.

9. आता फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तात्पुरता पासवर्ड डिसेबल करा आणि पॅटर्न क्रिएट करा.

how to unlock your Android Phone

Windows शी ब्लूटूथ कसा कनेक्ट करावा, जाणून घ्या

मात्र असं न झाल्यास तुम्हाला तुमचा फोन रिकव्हर करण्यासाठी फॅक्टरी रिसेटचा पर्याय उरतो. तुम्ही तुमच्या फोनला अँड्रॉईड (Android) डिव्हाईस मॅनेजरच्या माध्यमातून रिसेटही करु शकता. मात्र यामध्ये तुमच्या फोनमधील डेटाही पूर्णपणे जाऊ शकतो. त्यामुळे हा पर्याय निवडताना विचारपूर्वक निवडा.

how to unlock your Android Phone

Electronic Scooter Battery: भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी लाइफ किती आहे?

अँड्रॉइड 4.4 किंवा त्यापेक्षा जुन्या फोनचा अनलॉक पॅटर्न तुम्ही जीमेलच्या साहाय्यानेही सहजपणे हटवू शकता.

1. अनेकवेळा तुम्ही चुकीचा पासवर्ड टाकल्यामुळे तुमचा फोन लॉक होतो, यानंतर तुम्हाला 'Forgot Password' हा पर्याय दिसतो.

2. यानंतर तुमचा जीमेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.

3. यानंतर तुमच्या फोनचं स्क्रीन लॉक रिसेट करा.

अशा पद्धतीने तुम्ही तुमचा लॉक झालेला फोन पुन्हा अनलॉक करु शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com