Homemade Face Pack: हवेतील प्रदूषणामुळे त्वचेवर घाण साचते. त्यामुळे त्वचेवर टॅनिंग वाढते. त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अशा वेळी महिला अनेक ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. पण याचा काही फायदा होत नाही. पण आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती फेसपॅक सांगणार आहोत ज्यामुळे टॅनिंगची समस्या दूर होईल. हे पदार्थ तुमच्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणार आहेत.
हळद आणि कच्चे दूध
हे फेसपॅक तयार करण्यासाठी हळद पावडर, कच्चे दूध मिक्स करून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर 20 मिनिटं ठेवावी. नंतर हलक्या हाताने मसाज करावी आणि स्वच्छ पाण्याने चेहरा धुवाव. हा फेसपॅक आठवड्यातून 2 वेळा लावावा.
दही आणि बेसन
चमकदार त्वचेसाठी तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता. यासाठी एका भांड्यात एक चमचा दही आणि एक चमच बेसन यांचे चांगले मिश्रण बनवावे. हे पॅक चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करावी. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. या पॅकमध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस देखील टाकू शकता. हा पॅक आठवड्यातून एक किंवा दोनदा लावू शकता.
टोमॅटो आणि मध
चेहऱ्यावरील डाग कमी करायचे असेल तर तुम्ही टोमॅटो आणि मधापासून तयार केलेला फेसपॅक लावू शकता. हे सर्व पदार्थ एका भाड्यांत घ्यावे आणि चांगले मिक्स करावे. मधामध्ये टोमॅटोचा रस मिक्स करून चेहऱ्यावर लावावे. हे पॅक चेहऱ्यावर 10 मिनिट लावून ठेवावे. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होतील.
हळद आणि बेसण
हे पॅक तयार करण्यासाठी एका भांड्यात बेसण, हळद, गुलाब जल आणि थोडे कच्चे दूध मिक्स करावे. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि मानेवर लावावे. 10 ते 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या चमक येतो.
मसुळ दाळ
चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी तुम्ही मसुळ दाळचा वापर करू शकता. यासाठी मसुळ दाळ रात्री दूधामध्ये बिडत ठेवावी. दुसऱ्या दिवशी ही पेस्ट चेहऱ्यावर लावावी. नंतर हलक्या हाताने मसाज करावी. नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.