Mobile अन् Laptop च्या वापरानंतर 'या' 5 ट्रिक्सने दूर करा डोळ्यांचा थकवा

अनेक लोक लॅपटॉप आणि मोबाईलवर वेळ घालवत असल्याने डोळ्यांना थकवा जाणवतो. अशावेळी काय करावे हे जाणून घेऊया.
Eye Care Tips
Eye Care TipsDainik Gomantak
Published on
Updated on

Digital Eye Care Tips: सध्याच्या आधुनिक काळात प्रत्येकजण मोबाईल आणि लॅपटॉपवर बराच वेळ घालवताना दिसतात.

ऑफिस व्यतिरिक्त रिल्स, व्हिडिओ किंवा सोशल मिडियासाठी लॅपटॉप आणि मोबाईलचा वापर करतात.

यामुळे डोळ्यांची जळजळ होणे, डोळ्यांना थकवा जाणवणे अशा समस्या निर्माण होतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या ट्रिक्स वारून डोळ्यांची काळजी घेऊ शकता.

  • लॅपटॉपवर काम करतांना ब्रेक घ्यावा

लॅपटॉप वर काम करताना थोडावर ब्रेक घावा. ऑफिसमध्ये असो किंवा घरात काम करतांना ब्रेक घेणे गरजेचे असते. 5 ते 10 मिनिटांचा ब्रेक घेणे डोळ्यांसाठी गरजेचा आहे.

यासाठी तुम्ही बाहेर थोडे फिरून येऊ शकता. जेव्हा तुम्ही ब्रेक घेता तेव्हा मोबाईल वापरणे टाळावे. यामुळे तुमच्या डोळ्यांवरचा ताण कमी होईल. तसेच डोळ्यांना आराम मिळेल.

  • डोळ्यांचा व्यायाम करावा

तुम्हीही जर लॅपटॉपवर काम करत असाल तर थोडावेळ ब्रेक घेऊन तुम्ही डोळ्यांचा व्यायम करू शकता.

कामातून थोडावेळ ब्रेक घेऊन डोळे वर-खाली फिरवावे. यामुळे डोळ्यांचा थकवा आणि जळजळपणा कमी होतो. डोळ्यांना कोरडेपणा जाणवत नाही.

Eye Care Tips
Palmistry: तुमच्या हातावर आहेत का राहु रेषा? मग प्रचंड धनाचे मालक होण्यासाठी तयार राहा
  • थंड पाण्याने डोळे धुवावे

मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर करणाऱ्या लोकांनी एका ठाराविक वेळाने थंड पाण्याने डोळे धुतले पाहिजे.

थंड पाण्याने डोळे धुतल्यास डोळ्यांना फ्रेश वाटते. तुम्हाला परत काम करण्यास उत्साह निर्माण होतो.

  • डोळ्यांना मसाज करावी

डोळ्यांचा थकवा आणि जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही डोळ्यांना मसाज करू शकता.

यासाठी थोडावेळ डोळे बंद करावे आणि डोळ्यांवर हलक्या हाताने मसाज करावी. यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटेल.

  • डोळ्यांवर काकडीचा किस ठेवावा

काकडीचा गुणधर्म थंड असते. यामुळे डोळ्यांचा जळजळपणा किंवा थकवा दूर करण्यासाठी तुम्ही काकडी किसून डोळ्यावर ठेऊ शकता. यामुळे डोळ्यांना थंडावा मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com