White Hair Care Tips: पांढऱ्या केसांमुळे डोकं झाकावे लागतय? काळे अन् घनदाट कसांसाठी वापरा 'हे' घरगुती उपाय

पांढऱ्या केसांची समस्या दुर करायची असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय फॉलो करु शकता.
White Hair Care
White Hair CareDainik Gomantak
Published on
Updated on

White Hair Care Tips: आजकाल अनेक तरुणांमध्ये पांढऱ्या केसांची समस्या वाढत चालली आहे. पूर्वी हा वाढत्या वयाचा परिणाम मानला जात होता, पण आता 25 ते 35 वयोगटातील लोकांना पांढरे केस येण्यास सुरुवात झाली आहे. 

यामुळे तरुणांना कमी आत्मविश्वास सहन करावा लागतो. पांढरे केस लपवण्यासाठी अनेक लोक रासायनिक रंग वापरतात. ज्यामुळे नुकसान होऊ शकते. 

पांढरे केस टाळण्यासाठी महिला आणि पुरुष डोकं खुप झाकतात. पण आता टेन्शन घेण्याची गरज नाही, काही घरगुती उपायांनी केस पुन्हा काळे होऊ शकतात.

tea
teaDainik Gomantak
  • चहा

आपण दिवसाची सुरुवात चहापासून करतो. पण हाच चहा पांढरे केस काळे होण्यास मदत करतात. यासाठी काळ्या चहाची पाने शिजवून केसांना लावा आणि काही वेळ ठेवल्यानंतर शॅम्पूने डोके धुवावे.

तुम्ही चहाची पाने बारीक करून पेस्ट तयार करू शकता आणि त्यात लिंबाचा रस (Lemon Juice) घालू शकता. नंतर हे मिश्रण केसांच्या मुळात लावावे आणि कोरडे झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवावे. असे केल्यास केस काळे होण्यास मदत होइल.

White Hair Care
Red Rice Benefits: पांढऱ्या तांदळापेक्षा लाल तांदळाचे सेवन का आरोग्यदायी? वाचा सविस्तर
 Curry Leaves
Curry Leaves Dainik Gomantak
  • कढीपत्ता

जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण अनेकदा कढीपत्त्याचा वापर करतो. परंतु तुम्हाला माहित आहे का की याचा वापर केसांचे आरोग्य (Hair) सुधारण्यासाठी केला जाऊ शकतो.

सर्वात पहिले कढीपत्ता, आवळा पावडर आणि ब्राह्मी पावडर मिक्समध्ये बारीक करून घ्यावे. पेस्ट तयार झाल्यावर 30 मिनिटे केसांवर लावावे नंतर  स्वच्छ पाण्याने केस धुवावे.

Amla
AmlaDainik Gomantak
  • आवळा पावडर

आवळा हे केसांसाठी सर्वोत्तम औषध मानले जाते. म्हणूनच केसांच्या अनेक उत्पादनांमध्ये त्याचा वापर केला जातो. याच्या मदतीने आयुर्वेदिक पद्धतीने केस काळे करता येतात. सर्वात पहिले आवळा पावडर एका भांड्यात ठेवा आणि ती काळी होईपर्यंत शिजवा.

आता त्यात थोडे खोबरेल तेल टाका आणि मंद आचेवर गरम करा आणि नंतर ते थंड होण्याची प्रतीक्षा करा. दुसऱ्या दिवशी ते एका काचेच्या बाटलीत ठेवावे आणि तुमच्या केसांच्या मुळात मसाज करावी.असे केल्याने केस काळे होण्यास मदत मिळते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com