तरुण वयातच केस पांढरे होतायत? मग करा 'या' गोष्टींचं सेवन

थायरॉईड, अॅनिमिया सारख्या आजारांना बळी पडूनही अनेक वेळा लोकांचे केस कमी वयात पांढरे होतात.
Home Remedies For White Hair
Home Remedies For White HairDainik Gomantak
Published on
Updated on

Home Remedies For White Hair: तरुण वयातच केस पांढरे होतायत? मग करा 'या' गोष्टींचं सेवनआपले केस दीर्घकाळ दाट आणि काळे दिसावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. केसांमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडते असे म्हटले जाते, पण केस कधी कधी तुमचे सौंदर्य बिघडवतात. आजकाल लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या सामान्य झाली आहे.

Home Remedies For White Hair
सई ताम्हणकर आहे 'या' निर्मात्याच्या प्रेमात; 'दौलतराव' सापडल्याची दिली कबुली

आजकाल तरूणाई पांढऱ्या केसांमुळे (Hair Care Tips) त्रस्त झालेली पाहायला मिळते. थायरॉईड, अॅनिमिया सारख्या आजारांना बळी पडूनही अनेक वेळा लोकांचे केस कमी वयात पांढरे होतात. शरीरात आणि केसांमध्ये पौष्टिकतेची कमतरता टाळण्यासाठी, लोकांनी त्यांच्या आहारात त्या पदार्थांना अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे ज्यात जीवनसत्त्वे डी, ई आणि बी 12 मुबलक प्रमाणात असतात.

अंडी : अंडी हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात तसेच त्यामध्ये भरपूर पोषण असते. केस सुधारण्यासाठी आणि पांढऱ्या केसांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही अख्खे अंडे खावे.

दही : दह्यामध्ये व्हिटॅमिन-बी12 भरपूर असते ज्यामुळे केस काळे राहण्यास मदत होते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही उन्हाळ्यात दही लस्सी बनवूनही याचे सेवन करू शकता.

सोयाबीन दूध : अनेक गंभीर आजारांपासून मुक्त होण्यासाठी दररोज सोया दूध पिण्याची देखील शिफारस केली जाते. सोया मिल्कमध्ये व्हिटॅमिन-बी12 मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे केस काळे होतात, त्यामुळे तुम्ही त्याचे सेवन करावे.

मेथी : मेथीमध्ये भरपूर लोह आणि फायबर असते, जे केसांमध्ये मेलेनिन नावाचे घटक वाढवण्यास सक्षम असते. मेलेनिनची कमतरता हे केस अकाली पांढरे होण्याचे एक कारण मानले जाते, म्हणूनच आपण अशा पदार्थांचे सेवन केले पाहिजे ज्यामध्ये मेलेनिन असते.

डाळ : व्हिटॅमिन बी 9 ने भरपूर डाळींचे सेवन केल्याने केस पांढरे होत नाहीत. यामुळे केसांच्या रोमकांना फायदा होतो, ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहते आणि केस लवकर पांढरे होत नाहीत.

हिरव्या भाज्या : व्हिटॅमिन बी-6, व्हिटॅमिन बी-12 आणि इतर पोषक तत्त्वे हिरव्या भाज्यांमध्ये आढळतात. ते शरीरात आरबीसी तयार करतात आणि केस काळे ठेवण्यास मदत करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com