Home Remedies For Stress: प्रत्येकवेळी स्ट्रेसमध्ये राहत असाल, तर 'या' टिप्सने मिळेल मुक्ती

सारख तणावाखाली राहिल्याने शारिरिरक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.
Home Remedies For Stress:
Home Remedies For Stress: Dainik Gomantak
Published on
Updated on

Home Remedies For Stress

आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव येणे सामान्य आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टींच्या तणावाखाली असतात. पण जेव्हा तुमच्या कामावर परिणाम होऊ लागतो आणि पुरेशी झोप होत नाही तेव्हा ही समस्या तुम्हाला अधिक त्रास देऊ लागते.

यामुळे तुम्हाला शारीरिक समस्यांनाही सामोरे जावे लागते. तणावाची वेळीच काळजी घेतली नाही तर त्याचे रूपांतर नैराश्यात होऊ शकते. म्हणूनच, हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात तज्ञांनी सुचवलेल्या गोष्टी नक्की केल्या पाहिजे.

नेहमी घरचे जेवण घ्यावे

बाहेरच्या पदार्थांपेक्षा घरात बनवलेले पदार्थ खाणे आरोग्यदायी असते. याचा परिणाम तुमच्या शरीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील होतो. जर तुम्ही घरी बनवलेले पदार्थ खाता तेव्हा तुम्हाला योग्य मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी मिळते. जे तणाव आणि मूड नियंत्रित करण्यासाठी आवश्यक असतात. तसेच बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता, ज्यामुळे तुम्हाला चिडचिड आणि अशक्तपणा येतो.

ऊन्हात बसावे

तणाव कमी करण्यासाठी आपण दररोज किमान 10 मिनिटे सूर्यप्रकाशात बसायला हवे. थंडीच्या दिवसांमध्ये सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे सेरोटोनिन हार्मोनची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्य वाढू शकते. जेव्हा तुम्ही उन्हात बसता तेव्हा आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. रात्री झोपही चांगली लागते.

व्यायाम करा

तणाव कमी करण्यासाठी दीर्घ श्वास घ्यावा. यामुळे माणसाच्या मेंदूमध्ये होणारे हार्मोनल बदल नियंत्रित करता येतात. ज्यामुळे तुमचा मूड हलका होतो.

सोशल मीडियापासून दूर

तणाव कमी करण्यासाठी सोशल मीडियावर घालवलेला वेळ कमी करा. जेव्हा आपण सोशल मीडियावर वेळ घालवतो तेव्हा त्याचा आपल्या कामावर परिणाम होतो. झोपेवरही परिणाम होतो. अनेकवेळा आपण सोशल मीडियाच्या पोस्ट्स पाहून तसं बनण्याचा प्रयत्न करतो. लाइक्स आणि फॉलोअर्स मिळवण्याचा प्रयत्न केल्याने चिडचिडेपणा आणि अस्वस्थता यासारख्या समस्या उद्भवतात. यामुळे अनेकांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.

शांत ठिकाणी बसावे

तुमचे मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी शांत वातावरणात एकांतात वेळ घालवावे. यामुळे तुम्ही शरीर आणि मन यांच्यात संतुलन निर्माण करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com