Home Remedies on Acidity: अनेक लोकांना जेवण केल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर अचानक छातीत जळजळ सुरू होते. यामागे अनेक कारणे असू शकतात.
पण अनेकदा वेळेवर न जेवणं, जास्त खाणं, फास्टफुडचे अतिसेवन करणे आणि चुकीच्या सवयी यामुळे असा त्रास होतो. खूप मसालेदार पदार्थ खाल्ल्याने देखील जळजळ होते.
त्यामुळे हार्ट बर्नची समस्या सुरू होते. छातीत जळजळ झाल्यामुळे अनेक वेळा लोक औषधांचे सेवन करतात. पण अशावेळी नेहमीच औषधे घेण्याची गरज नाही, तर काही घरगुती उपाय करून देखील हा त्रास कमी करता येतो.
घरगुती उपाय
छातीत तीव्र जळजळ होत असेल तर मिंट फ्लेवर्ड च्युइंगम चावून खावे. ते चघळल्याने जळजळ पूर्णपणे कमी होण्यास मदत मिळते. छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी बेकिंग सोडा खूप प्रभावी आहे.
यासाठी तुम्ही एक ग्लास पाणी घ्या, त्यात एक चतुर्थांश बेकिंग सोडा टाका आणि मग ते मिक्स करून प्या. यामुळे 15 मिनिटांत आराम मिळेल. बेकिंग सोडा प्यायल्यानंतर अस्वस्थता, उलट्या आणि छातीत जळजळ होण्याची समस्या कमी होते.
कॅमोमाइल चहा
छातीत होणारी जळजळ कमी करण्यासाठी तुम्ही कॅमोमाइल चहा देखील पिऊ शकता. यामध्ये असलेले अनेक प्रकारचे गुणधर्म पोटासाठी खूप फायदेशीर असतात. जेवल्यानंतर प्यायल्यास तुम्हाला हा त्रास होणार नाही.
बदाम
बदामचे सेवन केल्याने तुमच्या छातीत होणारी जळजळ कमी होउ शकते.
थंड दुध
छातीत होणारी जळजळ कमी करायची असेल तर थंड दुध (Milk) प्यावे.
आवळा कॅंडी
छातीत होणारी जळजळ कमी करायची असेल आवळा किंवा आवळा कॅंडीचे सेवन केले पाहिजे.
कोरफडचा रस
छातीत होणाऱ्या जळजळ लगेच कमी करायची असेल तर कोरफडीचा वापर करावा. ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. यामुळे तुमचे शरीर थंड राहते. छातीत जळजळ होण्याची समस्या असल्यास तुम्ही कोरफड रस पिऊ शकता.
सफरचंद
जर तुम्ही रोज सफरचंद खाल्ले तर तुमच्या पोटातील सर्व अॅसिड लगेच कमी होते. कारण अॅसिडमुळे छातीत जळजळ होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.