Inverter Battery: अनेक लोकांकडे लाइट गेल्यावर इन्व्हर्टरचा वापर केला जातो. पण इन्व्हर्टरच्या बॅटरीची काळजी कशी घ्यावी याकडे अनेकांचे दुर्लक्ष होते. इन्व्हर्टरची बॅटरी चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास घरातील वस्तुचे नकसान होऊ शकते. यामुळे कोणत्या इन्व्हर्टरची बॅटरी योग्य ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे.
स्वयंपाक घरात ठेऊ नका
जर तुम्ही स्वयंपाकघरात इन्व्हर्टरची बॅटरी ठेवत असाल तर खुप मोठी चुक करत आहात. कारण या ठिकाणी पाणी, गॅस याचा वापर अधिक असतो. यामुळे इन्व्हर्टरची बॅटरी लवकर खराब होऊ शकते. यामुळे इन्व्हर्टरची बॅटरी स्वयंपाक घरात ठेऊ नका.
बेडरूममध्ये ठेऊ नका
अनेकजण बेडरूममध्ये इन्व्हर्टरची बॅटरी ठेवतात. तुम्हीही असे करत असाल तर हे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण वातावरण हवेशीर नसल्यामुळे त्यातून विषारी वायू बाहेर पडू लागतो. त्यामुळे खोलीचे तापमान नेहमी गरम राहते. एवढेच नाही तर बॅटरीचा स्फोट होण्याचा धोका असतो,त्यामुळे बेडरूममध्ये बॅटरी ठेऊ नका.
बाल्कनीत ठेऊ नका
काही लोक बॅटरी बाल्कनीमध्ये ठेवतात. पण या ठिकाणी इन्व्हर्टर बॅटरी ठेवणे सुरक्षित नसते. कारण येथे पाण्याचा धोका खूप जास्त आहे. बॅटरी इथे ठेवल्यास ती लवकर खराब होण्याचा धोका असतो.
बॅटरी ठेवण्याची योग्य जागा कोणती?
बॅटरी नेहमी व्हेंटिलेशन असलेल्या ठिकाणी ठेवावी. पण त्या ठिकाणी पाणी आणि सुर्यप्रकाश पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी. लिव्हिंग रूममध्ये इन्व्हर्टर बॅटरी ठेऊ शकता.
या गोष्टींची घ्यावी काळजी
इन्व्हर्टरची बॅटरी कधीही जमिनीवर ठेऊ नका.
ओलावा असलेल्या ठिकाणी ठेऊ नका.
बॅटरीच्या आजूबाजुचा परिसर स्वच्छ ठेवावा.
बॅटरी नेहमी उंच जागेवर ठेवावी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.