Holi 2023: होळीपूर्वी घरी आणा 'या' गोष्टी; कधीही भासणार नाही पैशाची कमतरता

ज्योतिषशास्त्रानुसार या काळात केलेले उपाय खूप प्रभावी असतात
Holi 2023
Holi 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Astro Tips For Holi 2023: रंगांचा सण महणजे होळी. हा सण सनातन धर्माच्या प्रमुख सणांपैकी एक आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेली होळी यंदा ८ मार्च २०२३ रोजी साजरी होत आहे.

होळीच्या 8 दिवस आधी सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 पासून होलाष्टक सुरू झाले आहे. या दरम्यान कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य करणे टाळले जाते.

होलिका दहनाच्या दुसर्‍या दिवशी सर्व वाईट विसरून रंगांनी होळी खेळली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात केलेले उपाय खूप प्रभावी असतात. ज्यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही.

  • वास्तुदोष टाळण्यासाठी कोणते उपाय करावे

जर तुम्ही भरपूर पैसा कमावत असाल, पण एवढे पैसे असूनही तुम्हाला सछ मिळत नसेल तर ही लक्षणे वास्तुदोषाची मानली जातात. घरातील वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी, होळाष्टक आणि होलिका दहन दरम्यान, आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर एक सुंदर तोरण लावावे. या उपायाने तुमच्या घरात निर्माण झालेले वास्तू दोष कमी होऊ शकतात.

Holi 2023
Laptop Repairing Tips: लॅपटॉपची बॅटरी चार्ज होत नसेल तर घरीच ट्राय करा ही ट्रीक, होईल मोठी बचत
  • मत्स्यालय ठेवण्यासाठी योग्य दिशा

जर तुम्हाला तुमच्या घरात आवक वाढवायची असेल तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराच्या उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला मत्स्यालय ठेवावे. ही दिशा धनाचे देवता कुबेरची दिशा मानली जाते. या दिशेला मत्स्यालय ठेवल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती वाढते.

Fishpot
FishpotDainik Gomantak
  • बांबुचे झाड

वास्तुशास्त्रात बांबूच्या रोपट्याला खुप महत्त्व आहे. हे झाड घरी ठेवणे खूप शुभ मानले जाते. ज्या घरामध्ये बांबूचे रोप असते तेथे नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे होळीपूर्वी घरात बांबूचे रोप लावावे. या वनस्पतीच्या सकारात्मक प्रभावामुळे घरात उपस्थित सदस्यांचे आरोग्य देखील चांगले राहते.

bamboo plant
bamboo plantdainik Gomantak
  • क्रिस्टल कासव

घरामध्ये क्रिस्टल कासव ठेवल्यास सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो. आर्थिक प्रगती देखील वाढते असे मानले जाते. त्यामुळे होळीपूर्वी घरात क्रिस्टल कासव घरात आणावे.

crystal tortoise
crystal tortoiseDainik Gomantak

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com